‘युवा वॉरियर्स’द्वारे भाजपची तरुणांना साद, उत्तर महाराष्ट्रात दोनशेहून अधिक शाखा

गेल्या आठ दिवसांत या नेत्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रात युवा वाॅरियर्सच्या दोनशेहून अधिक शाखा सुरू झाल्या.
Chandrashekhar bavankule.jpg
Chandrashekhar bavankule.jpg

शिर्डी : जनसंघ, आणीबाणी व श्रीराम मंदिर हे भाजपच्या (BJP) वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व त्याचे महत्त्व सध्याच्या तरुणाईला फारसे ठाऊक नाही. अशा काळात युवा वर्गाला सोबत घेण्यासाठी भाजपने युवा वाॅरियर्स हे नवे अपत्य जन्माला घातले. त्याच्या संगोपनाची जबाबदारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. (BJP calls on youth through 'Youth Warriors', more than two hundred branches in North Maharashtra)

गेल्या आठ दिवसांत या नेत्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रात युवा वाॅरियर्सच्या दोनशेहून अधिक शाखा सुरू झाल्या. भाजपने आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर ठेवून जाणीवपूर्वक संघटनात्मक बांधणीवर जोर देत विविध समाज घटकांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे.

येथील भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात बावनकुळे यांच्या सोबत होते. ते म्हणाले, ‘‘या दौऱ्यास तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत गेल्या आठवडाभरात दोनशेहून अधिक शाखा सुरू झाल्या. शिर्डीत रात्री दहा वाजता शंभराहून अधिक युवकांनी मोटारसायकल रॅली काढून स्वागत केले. असेच स्वागत धुळे व नंदूरबार, या अदिवासीबहुल जिल्ह्यांत देखील झाले. तरुणाईच्या आवडत्या विषयावर त्यांच्या सोबत संवाद साधून त्यांना सोबत घेणे, ही या मोहिमेमागील मूळ संकल्पना आहे.’’
‘‘दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात राज्यभर सी. एम. चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन केले. चषक व टी-शर्टचे वितरण केले. त्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना सोबत घेण्याचा प्रयत्न झाला. आता संघटनात्मक बांधणी करून युवा वर्गाला सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.’’

संघटनात्मक बांधणीसाठी दौरे

भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचे संघटनात्मक बांधणीसाठी नियोजनपूर्व दौरे सुरू आहेत. ओबीसी आघाडीपासून ते महिला आघाडीच्या माध्यमातून बैठका आणि मंथन सुरू आहे. युवा वाॅरियर्सच्या बांधणीसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.
- राजेंद्र गोंदकर, जिल्हाध्यक्ष, उत्तर नगर

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com