साईबाबांच्या शिर्डीत मोठा दरोडा ! घरातील व्यक्तींचे हातपाय बांधून लुटले 25 तोळे

घरातील आशिष व त्यांच्या आजी ताराबाई यांना साडीच्या साह्याने बांधून ठेवले. पणजी सुगंधाबाई यांना कोपऱ्यात बसवून ठेवले. जिवे मारण्याची धमकी देत चावी हस्तगत केली.
Daroda.jpg
Daroda.jpg

शिर्डी : नेत्र सिक्युरिटी सर्व्हिसेसद्वारे इतरांच्या संस्था व बंगल्यांना सुरक्षारक्षक पुरविणारे येथील तरुण हॉटेल व्यावसायिक आशिष गोंदकर यांच्या हरिओम बंगल्यावर काल (ता. ५) दरोडा पडला. सात दरोडेखोरांनी त्यांच्यासह आजीला साडीच्या साह्याने बांधले. जिवे मारण्याची धमकी देत कपाटाची चावी हस्तगत केली. तसेच, पंचवीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, तीन मोबाईल व अडीच लाख रुपयांची रोकड पळविली. (Big robbery in Sai Baba's Shirdi! 25 weights were looted by tying the hands and feet of the people in the house)

पहाटे अडीचच्या सुमारास दरोडेखोरांनी कुंपणावरून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील आशिष व त्यांच्या आजी ताराबाई यांना साडीच्या साह्याने बांधून ठेवले. पणजी सुगंधाबाई यांना कोपऱ्यात बसवून ठेवले. जिवे मारण्याची धमकी देत चावी हस्तगत केली. कपाटातील रोख रक्कम व अन्य ऐवज लुटून नेला. दरोडेखोर पाऊण तास बंगल्यात होते. एक-दोन जण बंगल्याबाहेर उभे होते. दरोडेखोरांनी अर्ध्या विजारी व टी-शर्ट घातले होते. ते आपसांत हिंदी व वेगळ्या धाटणीच्या मराठीत बोलत होते, असे गोंदकर यांनी सांगितले.

दरोडेखोर निघून गेल्यानंतर आशिष यांनी सुशांत औताडे यांना फोन केला. औताडे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा..

हेही वाचा..

अरणगावात गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्‍ध्वस्त

अरणगाव : जामखेड तालुक्यातील अरणगाव शिवारात सुरू असलेला, गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त करण्याची कारवाई जामखेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे बुधवारी केली. या कारवाईत ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अरणगाव येथील गहिनीनाथ बापू पवार हा शेतातील विहिरीजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचा अड्डा चालवत होता. तेथेच तो गावठी दारूची विक्री करीत होता. बुधवारी (ता. चार) पोलिसांनी या अड्ड्यावर छापा घातला. यात ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत तो जागेवर नष्ट केला. यात ४० हजारांचे कच्चे रसायन, तर दीड हजारांची गावठी दारू यांचा समावेश होता. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रोहित मिसाळ यांनी गहिनीनाथ पवारविरोधात फिर्याद दिली.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com