राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होऊन, म्हणणे सादर करण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे, मुख्य सचिव व महापालिका आयुक्‍तांना न्यायालयाने नोटिसा काढल्या आहेत.
prajakt tanpure.jpg
prajakt tanpure.jpg

नगर : महापालिकेच्या (Mahapalika) नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून उपअभियंता बल्लाळ यांची पदोन्नती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी कायम ठेवली होती. (Bench notice to Municipal Commissioner including Minister of State Tanpure)

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होऊन, म्हणणे सादर करण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे, मुख्य सचिव व महापालिका आयुक्‍तांना न्यायालयाने नोटिसा काढल्या आहेत.

शहरात नगरपालिका अस्तित्वात असताना कल्याण बल्लाळ यांना १९९५मध्ये सबओव्हरसिअर या पदावर नियुक्‍ती देण्यात आली होती. सन २०००मध्ये कनिष्ठ अभियंता हे पद भटक्‍या जमातीसाठी (एनटी) सरळ सेवेने भरतीसाठी राखीव असताना, त्या पदावर कल्याण बल्लाळ यांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली.

त्यानंतरच्या काळात मनपाने बल्लाळ यांना उपअभियंता पदावर पदोन्नतीदेखील दिली. याविरोधात शेख यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे सन २०११पासून पाठपुरावा करीत, नियमबाह्यपणे पदोन्नती झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सन २०२०मध्ये शासनाने त्याची दखल घेऊन, बल्लाळ यांच्या पदोन्नतीबाबत नियुक्त प्राधिकारी या नात्याने महापालिका आयुक्त यांनी एक महिन्यात निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे बल्लाळ यांना पदोन्नती देण्यात झालेल्या अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी- कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्याविरोधात नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश २८ फेब्रुवारी २०२० रोजी काढले.

तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कार्यवाही न करता वेळकाढूपणा केला. त्याबाबत शेख यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार करून, ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावरून शासनाने १० नोव्हेंबर २०२० रोजी मनपा आयुक्तांना बल्लाळ यांची शाखा अभियंता या पदाच्या पदोन्नती साखळीतील सबओव्हरसिअर या पदाच्या समकक्ष पदावर पदावनती करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. मात्र, ही कार्यवाही रद्द करण्याबाबत बल्लाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी बल्लाळ यांच्या पदावनतीबाबतच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती.
शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी १६ जुलैला होणार आहे.
शेख यांच्या वतीने ॲड. आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com