मंत्री गडाखांच्या मुळा कारखान्याच्या दारात बाळासाहेब मुरकुटेंचे उपोषण - Balasaheb Murkute's fast at the door of Gadakh's radish factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मंत्री गडाखांच्या मुळा कारखान्याच्या दारात बाळासाहेब मुरकुटेंचे उपोषण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

'मुळा'च्या कारभारावर उपस्थितांनी टीका करुन मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागू.

सोनई : कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उसाला प्रतिटन दोन हजार आठशे रुपये भाव मिळालाच पाहिजे. या मागणीसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) व भाजपा कार्यकर्त्यांनी आज सकाळी मुळा साखर कारखान्याच्या प्रवेशद्वार परिसरात लाक्षणिक उपोषण केले. (Balasaheb Murkute's fast at the door of Gadakh's radish factory)

माजी आमदार मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता उपोषणास सुरुवात झाली. या वेळी 'जय जवान जय किसान', 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे, स्वप्नील सोनवणे, अंकुश काळे , लक्ष्मण माकोणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

'मुळा'च्या कारभारावर उपस्थितांनी टीका करुन मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागू, असे भाषणात सांगितले. मागील आठवड्यात उसाच्या भाववाढी संदर्भात कार्यकारी संचालकास निवेदन देण्यात आले होते. यानंतर संचालक मंडळाने कुठलाही निर्णय जाहीर केला नसल्याने आज उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले व संचालक बापुसाहेब शेटे यांनी उपोषणस्थळी जाउन  कारखाना व्यवस्थापनाची बाजू मांडली. दुपारी दोन वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

गडाखांच्या मार्गदर्शनाखाली चोख कारभार

जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा साखर कारखान्याचे कामकाज नेहमीच सभासद हिताचे राहिले आहे. कारखान्यास मिळालेला उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार त्याची पावती आहे.
- नानासाहेब तुवर, अध्यक्ष, मुळा कारखाना 
 

येथील कारभार पारदर्शक

मुळा आणि ज्ञानेश्वर साखर कारखाने तालुक्याची कामधेनू आहे. योग्य नियोजन करीत नेहमीच उस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित पाहिले जाते. येथील कारभार पारदर्शक असल्यानेच मागील निवडणूक बिनविरोध झाली आहे. 
- सुनील वीरकर,सभासद, धनगरवाडी
 

हेही वाचा..

विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख