साईसंस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीचे संग्राम कोते नाराज आहेत का?

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे शिर्डीचे देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आल्याने अनेकांचे फटाके फुटू लागले. परंतु लगेचच पक्षाने आमदार आशुतोष काळे यांचे नाव जाहीर करून इतरांना चर्चेला संधीच मिळाली नाही.
Sangram kote 1.jpg
Sangram kote 1.jpg

नगर : शिर्डीतील साईसंस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांची निवड निश्चित झाली आहे. या निवडीबाबत युवक राष्ट्रवादीचे नेते संग्राम कोते नाराज आहेत का, असा प्रश्न एका फेसबूक पोस्टवरून पडला आहे. कोते यांनी स्वतःच्या फेसबूकपेजवरून याबाबत वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. (Are the NCP's Sangram Kote upset over the chairmanship of Sai Sansthan?)

कोते यांनी फेसबूकवर पोस्ट करताना म्हटले आहे,`` श्री साईबाबा संस्थानची अधिकृत घोषणा झालेली नाही. आणि मी माझ्या व्यावसायिक कारणामुळे पूर्ण वेळ अहमदनगर शहर व पुण्यात असल्यामुळे मी वेळ देऊ शकलो नसतो. म्हणून मी या पदाची मागणी देखील केलेली नाही. आणि मी दोन महिन्यांपूर्वी फेसबूकवर पोस्ट केली होती, की अजून वर्षभर कुठलेही पद मी घेणार नाही. म्हणून...``

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे शिर्डीचे देवस्थानचे अध्यक्षपद आल्याने अनेकांचे फटाके फुटू लागले होते, परंतु लगेचच पक्षाने आमदार आशुतोष काळे यांचे नाव जाहीर करून इतरांना चर्चेला संधीच दिली नाही. असे असले, तरी काही कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील नेत्यांना संधी मिळावी, अशी मागणी घातली होती. राष्ट्रवादीचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांच्याबाबतही कार्यकर्त्यांनी पक्षाकडे गळ घातली होती. मात्र राजकीय घडामोडीत त्यांची ही मागणी मागे पडली.

येत्या पंधरा दिवसांत न्यायालयीन प्रक्रियेनंतर ही निवड होणार आहे. राष्ट्रवादीला अध्यक्षपद तर शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळणार आहे. इतर विश्वस्तांबाबत मात्र संभ्रम आहे. ऐनवेळी कोणाची वर्णी लागेल, हे लगेचच सांगता येणार नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम कोते यांनी फेसबूकवर पोस्ट टाकून ते नाराज आहेत, असाच सूर आवळल्याची कार्यकर्त्यांची भावना तयार झाली आहे. नेमका त्यांनी ही पोस्ट कोणत्या उद्देशाने केली, याबाबत मात्र संभ्रम आहे.

याबाबत कोते यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत बोलण्याचे तूर्त टाळले. कोते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याचे मानले जाते.

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com