संगमनेरमध्ये नगरसेवकांची लसीकरण केंद्रावर मनमानी, भाजप कार्यकर्त्यांचे ठिय्या

नोंदणी न करता आपल्या मर्जीतील नागरिकांचे लसीकरण होत असल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, वशीलेबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत आज दुपारी नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.
Corona Vacsin.jpg
Corona Vacsin.jpg

संगमनेर : सर्वांसाठी कोरोनाच्या मोफत लसीकरणासाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असताना, संगमनेरातील क्रीडा संकुलात सुरु असलेल्या लसीकरणात काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांचा हस्तक्षेप सुरु आहे.

नोंदणी न करता आपल्या मर्जीतील नागरिकांचे लसीकरण होत असल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, वशीलेबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत आज दुपारी नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.

शासकिय नियमानुसार नगरपरिषदेने 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी
अ‍ॅपवरून लसीकरण केंद्र आणि वेळेची नोंदणी निश्‍चित केलेल्यांनाच लस मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र तरीही या लसीकरण केंद्रावर नगरसेवक व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप सुरुच असल्याने, संगमनेर भाजप आक्रमक झाली आहे. प्रत्यक्ष क्रीडा संकुलावर जाऊन वशिलेबाजी करणाऱ्या नगरसेवकांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची भाजप संगमनेर शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी झाडाझडती घेतली असता, अनेक अनियमित प्रकार आढळले.

सकाळपासून लसीसाठी रांगा लावलेल्या सर्वसामान्य नागरिकांना डावलून, वशिल्याच्या व नगरसेवकांच्या मर्जीतल्या आगंतुकांचे बेकायदेशीर लसीकरण सुरु होते. यावेळी ऑनलाईनच्या नोंदणीचा कुठेही ताळमेळ लागत नव्हता. या विरोधात संतप्त झालेल्या शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने पुन्हा लसीकरण सुरु झाले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या वेळी किशोर गुप्ता, जावेद जहागीरदार, शाम कोळपकर, सुनिल खरे, मुकुंद उपरे, शिरिष मुळे, वैभव लांडगे, सीताराम मोहरीकर, दीपक भगत, रोहित चौधरी, नितीन म्हस्के, संजय नाकिल, ऋषीकेश मुळे, सुधीर कुलकर्णी, अतुल कासट, संतोष पठाडे, नवनाथ वावरे, राहुल भोईर, सखाहरी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

हेही वाचा..

अधिवेशनाचा कालावधी वाढवावा

पाथर्डी : सध्या सुरू असलेले राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसच चालणार आहे. दोन दिवसात विधीमंडळ सदस्यांना घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव मांडणे, लक्षवेधी सुचना मांडणे यावर सत्ताधाऱ्यांनी निर्बंध आणले आहेत.

विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नानां उत्तरे देण्यास घाबरत असून, राज्यातील जनतेच्या हितासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी पाथर्डी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदार शाम वाडकर यांना निवेदनात म्हटले आहे की, राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासुन सुरू झाले असून, ते फक्त दोन दिवस चालणार आहे. यामुळे अधिवेशनात विधीमंडळ सदस्यांनी प्रश्न विचारणे, सविस्तर चर्चा करणे, लक्षवेधी सूचना मांडणे, स्थगन प्रस्ताव, विधानसभा अध्यक्षांची निवड करणे, यासह कुठलेही कामकाज होणार नाही.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com