शिर्डी विधानसभा मतदारसंघातील कोविडच्या माहितीसाठी लवकरच ऍप

साईसंस्थानच्या रुग्णालयात म्युकरमायकोसीससाठी स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांचा टास्कफोर्स निर्माण करण्याची मागणी आपण केली आहे.
 radhakrushna vikhe 1.jpg
radhakrushna vikhe 1.jpg

शिर्डी : पुढील सहा महिन्यांत शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदारसंघातील लसीकरण पूर्ण व्हावे, यासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधांची तयारी सुरू आहे. भविष्यात लसीकरणाची गावनिहाय नेमकी माहिती, खासगी रुग्णालये, साईसंस्थान व प्रवरा कोविड रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या लक्षात कळावी, म्युकरमायकोसीसबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी ऍप तयार केले जात आहे. (App for Kovid's information in Shirdi assembly constituency soon)

लवकरच हे अॅप सर्वांना उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले, तालुक्‍यातील कोविड रुग्णालये व केअर सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहे की नाही, याबाबतची माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहज मिळत नाही. ऍपमुळे ही अडचण दूर होईल. तसेच या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गाव व प्रभागनिहाय माहिती सर्वांना मिळेल. आशा सेविकांच्या सहकार्याने मतदारसंघातील कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. पुढील सहा महिन्यांत नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साईसंस्थानच्या रुग्णालयात म्युकरमायकोसीससाठी स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांचा टास्कफोर्स निर्माण करण्याची मागणी आपण केली आहे. 

या ऍप व अन्य मोहिमांसंदर्भात आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तालुक्‍यातील सर्व सरकारी व खासगी डॉक्‍टरांसमवेत संवाद साधला. याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय गायकवाड, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्यक्ष ऍड. रघुनाथ बोठे, सभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा.. 

मुबलक कांदा अन्‌ ठेवायचा वांदा 

सोनई :  कांदा पीक यंदा जोमात आले असल्याने शेतकरी आनंदी होते. परंतु या आनंदावर वाढत्या कोरोनाने पाणी फेरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळीबरोबरच शेतात, घरात साठवून ठेवण्याची वेळ आलेली आहे. 

मागील वर्षी तीन ते चार राज्यात भरपूर पाऊस झाल्याने गावरान कांद्याने भाव खाल्ला होता. मागील वर्षी कोरोना स्थिती आटोक्‍यात आल्यानंतर 
घोडेगाव बाजार समितीच्या कांदा लिलावात गावरान कांदा पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत दराने विकला होता. त्यावेळी आठवड्यात तीन लिलावात मोठी उलाढाल होऊन शेतकरी लखपती झाले होते. 

मागील दोन वर्षापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने यावर्षी अनेकांनी कांद्याची लागवड केली. सर्वांना उत्पादनही भरघोस मिळत आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यांपासून बाजार समितीचा लिलाव बंद असल्याने निघालेला कांदा चाळीबरोबरच शेतात, घरात ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाचे वातावरण होत असल्यामुळे हा कांदा पत्र्याचे शेट व पानकापडामध्ये सुरक्षीत ठेवण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरु झालेली आहे. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com