नगर जिल्ह्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री तनपुरेंनी केली ही घोषणा

अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा नवीन वीज उपकेंद्र उभारली जाणार असून त्यापैकी दोन वीज उपकेंद्राचा श्रीरामपूर तालुक्याला थेट फायदा होणार.
prajakt tanpure 1.jpg
prajakt tanpure 1.jpg

श्रीरामपूर : राज्य सरकारने लागु केलेल्या नवीन वीज धोरणास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी थकीत वीज देयकांचा भरणा करीत असल्यामुळे आता शेतकर्‍यांना (Farmer) वीजेसंबधी समस्यांना भेडसावणार नाही. याची विशेष दक्षता घेण्याच्या सुचना उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Ten power substations to be set up in Nagar district: Minister Prajakt Tanpure)

महावितरणच्या येथील विभागीय कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्यासह आदी उपस्थित होते. उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी आढावा बैठकीत विविध पदाधिकारी, नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि विविध समस्या जाणून घेत महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

राज्यातील नवीन वीज धोरणाद्वारे शेतकऱ्यांना थकीत वीज देयकात भरीव सुट दिली. असल्याचे ते म्हणाले. तसेच अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा नवीन वीज उपकेंद्र उभारली जाणार असून त्यापैकी दोन वीज उपकेंद्राचा श्रीरामपूर तालुक्याला थेट फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेला अखंडित वीजपुरवठा देण्याच्या सुचना संबधीत अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देताना, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी महावितरणने शेतकऱ्यांवर आर्थिक भार टाकु नये, अशा सुचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच नागरिक व शेतकऱ्यांनी चालु वीज बिल भरण्याचे आवाहन देखील उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी बैठकीत केले.

या वेळी आमदार कानडे व नगराध्यक्षा आदिक यांनी बैठकीत विविध सुचना मांडल्या. तर महावितरणचे कार्यकारी अभियंता थोरात यांनी तालुक्यातील चालू असलेल्या व नियोजित वीज योजनांची माहिती सादर केली. बैठकीला महावितरणचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील शेतकरी उपस्थित होते.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com