पारनेरमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे वाळुचोरी, खासदार विखे यांचा आरोप - Allegations of sand theft, MP Vikhe due to support of people's representatives, officials in Parner | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेरमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे वाळुचोरी, खासदार विखे यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

मांडओहळ धरणातुन कार्यान्वित असलेली कान्हुर पठारसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना थकीत विजबिलांमुळे बंद आहे.

टाकळी ढोकेश्वर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांचे पाठबळ मिळाल्याने वाळुचोरी राजरोसपणे सुरू आहे. हा सर्व अवैध वाळू व्यवसाय लवकरात लवकर बंद व्हावा, यासाठी सर्व पुराव्यानिशी जिल्हाधिकारी यांना भेटुन निवेदन देणार आहे. यानंतरही हा अवैध व्यवसाय बंद झाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सुचवलेल्या वासुंदे चौक ते बसस्थानक या रस्त्यास खासदार डाॅ. विखे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत 25 लाख रूपये मंजुर झाले, त्याचे भुमिपुजन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी,
अमोल साळवे, अरूण ठाणगे, सचिन सैद उपस्थित होते.

डाॅ. विखे म्हणाले, की प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधुन पारनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. डीपीडीसी मधूनही पारनेर तालुक्यातील विविध रस्ता कामांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

कान्हुर पठार सोळा गाव योजना सुरू करणार 

मांडओहळ धरणातुन कार्यान्वित असलेली कान्हुर पठारसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना थकीत विजबिलांमुळे बंद आहे , त्यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांच्या सरपंचाबरोबर बैठक करून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करून ती सुरू करण्यात येईल. 

हेही वाचा..

घाणेगाव शाळेसाठी वर्गखोल्यांसाठी निधी

पारनेर : सहा वर्षांपूर्वीच निर्लेखण करण्यात आलेल्या व गेली सुमारे तीन वर्षांपासून खासगी जागेत भरत असलेल्या घाणेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना अखेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या प्रयत्नातून दोन वर्ग खोल्यांसाठी 17 लाख 50 हजार रूपये मंजूर झाले आहेत.

येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोनही खोल्या जिर्ण झाल्याने व मुलांना बसण्यासाठी धोकादायक ठरल्यामुळे येथील वर्ग खासगी शाळेत भरविण्यात येत होते. गेली अनेक दिवसांपासून या मुलांची कुचंबना झाली होती. मात्र सभापती शेळके यांनी जिल्हा परिषदेमार्फत सातत्याने पाठपुरावा करूण 17 लाख 50 हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच जिल्हा परिषदेची शाळा खाजगी शाळेऐवजी स्वतःच्या इमारतीमध्ये भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

येथील जिल्हापरीषदेची शाळा धोकादायक झाल्यानंतर या शाळा खोल्यांचे नि्रर्लेखणही करण्यात आले, मात्र जिल्हा परिषदेकडून निधी मिळत नसल्याने या मुलांची बसण्याची गैरसोय झाली होती. त्या वेळी गावातील वर्ग भरविण्यास परवाणगी दिली.

वाबळे यांच्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय टळली होती. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचेही ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

शाळेसाठी खोल्या नसल्याने ग्रामस्थांनी शेळके यांच्याकडे निधी मिळविसाठी मागणी केली होती. शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, तत्कालीन सरपंच, उपसरपंच व सदस्य ,विकास वाबळे, पवन वाबळे, अमोल वाबळे, गणेश वाबळे, अनिल वाबळे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामास मंजुरी मिळविण्यात यश आल्याचे सभापती शेळके यांनी सांगितले. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख