आमदार पाचपुतेंचे दुर्लक्ष झाल्याने नागरी प्रश्नांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र

आमदार बबनराव पाचपुते यांचेतालुक्यात दुर्लक्ष असून, पहिल्या फळीतील सर्वपक्षीय नेत्यांची निवडणुकीपुरती छुपी युती सामान्यांच्या मुळावर येत आहे.
Babanrao pachpure.jpg
Babanrao pachpure.jpg

श्रीगोंदे : तालुक्यात प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून सामान्यांची परवड होत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांचे तालुक्यात दुर्लक्ष असून, पहिल्या फळीतील सर्वपक्षीय नेत्यांची निवडणुकीपुरती छुपी युती सामान्यांच्या मुळावर येत आहे. सामान्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करताना प्रस्थापित नेत्यांना सक्षम पर्याय देण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी केली असल्याची माहिती भाजपचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिली. (How did that happen! All party workers rallied after MLA Pachpute was ignored)

माजी नगराध्यक्ष एकनाथराव आळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, शेतकरी संघटनेचे विक्रम शेळके, ज्ञानदेव मोटे, अनिल भुजबळ, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे, भूषण बडवे, राजेंद्र निळकंठ नागवडे आदींची बैठक शहरातील विश्रामगृहावर झाली.

म्हस्के म्हणाले, ‘‘सगळ्याच सरकारी कार्यालयांत वाईट अवस्था आहे. पोलिस ठाण्यात अवैध धंदेवाल्यांना सन्मान मिळतो व सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील प्रत्येक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. तालुक्यात चार साखर कारखाने आहेत. कारखान्यांना असंख्य ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पेमेंट दिले जात नाही. या विषयावर कोणताच नेता बोलायला तयार नाही.’’

नेतेमंडळी सोडून कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी एक संघटना स्थापन करावी. संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रश्‍नांना वाचा फोडून न्याय देण्यासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तालुक्यातल्या छोट्या-मोठ्या संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारावा, असे बैठकीत ठरले.

सामान्यांना कोण वाली

बैठकीत सामाजिक, राजकीय प्रश्‍नांवर चर्चा झाली. सामान्य माणसांना कोणी वाली उरला नाही. त्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला तालुक्यातील मातब्बर नेतेमंडळींना वेळ नसल्याने, प्रत्येक कार्यालयात अधिकारीराज सुरू आहे. त्याविरोधात सर्वपक्षीय एकत्र येणार आहोत.
- राजेंद्र म्हस्के, भाजप नेते 

हेही वाचा..

Edited by - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com