शिवरायांच्या अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अटक

एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शिवरायांच्या अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अटक
2shripad_chindam_final.jpg

नगर : वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम (Shrikant Chhindam) यांना पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यापूर्वी एका टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर असून दोघांवर  गुन्हा दाखल आहे.  तेव्हापासून दोघेही जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात फरार होते. काल रात्री दोघांना तोफखाना पोलिसांनी त्यांना अटक केली. जेसीबीने टपरी उखडून ती जागा बळकावली असल्याचा आरोपही या दोघांवर आहे. 

तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या, ''दोन महिन्यापूर्वी घडलेल्या टपरीचालकांबाबत गुन्हा घडल्यापासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र, ते आढळून आले नाही. काल रात्री ते नगर शहरात आल्याची माहिती आम्हाला मिळाली, त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाच अटक केली असून त्यांच्या अन्य साथिदारांचा शोध सुरू आहे.''

स्मृती इराणींच्या विरोधात प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात
शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्याचे नगरसेवक पद गेले. तो दुसऱ्यांदा निवडून आला, तेही पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. श्रीपाद व श्रीकांत छिंदम या दोन्ही बंधूंवर नगर शहरातील पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जमाव जमवून मारहाण करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आदींचा त्यांत समावेश आहे. श्रीपाद याच्यावर पाच, तर श्रीकांत याच्यावर चार गंभीर गुन्हे तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
  
उपमहापौर छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. बिडवे यांनी याबाबत कर्मचारी संघटनेकडे तक्रार केली होती. हे संभाषण समाजमाध्यमातून अल्पावधीत राज्यभर व्हायरल झाले होते.

छिंदमचा राज्यभर निषेध सुरू झाला होता. त्यानंतर त्याने नगर शहरातून पळ काढला. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी श्रीपाद छिंदम याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात ९७/ २०१८ भारतीय दंडविधान कलम २९५ (अ), २९८, १५३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
Edited by : Mangesh Mahale  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in