कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर : बाळासाहेब थोरात

या समितीने सखोल अभ्यास आणि चर्चा करून शेतकऱ्यांच्याहिताचे तीन नवीनकृषी सुधारणा विधेयके तयार केली आहेत.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : कृषी (Agri) संबंधी कायदे हा राज्यांचा विषय असून, केंद्र सरकारने त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली होती. या समितीने सखोल अभ्यास आणि चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचे तीन नवीन कृषी सुधारणा विधेयके तयार केली आहेत. या विधेयकांचा मसुदा राज्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विचारार्थ ठेवण्यात येणार असून, दोन महिने त्यावर शेतकरी आणि सामाजिक संस्था आणि संघटनाच्या सूचना विचारात घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. (Agriculture Reforms Bill presented in the Legislative Assembly: Balasaheb Thorat)

मुंबई येथे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशी कृषी कायद्यावर बोलताना महसूल मंत्री नामदार थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने घाईघाईने लादलेल्या तीन कृषी कायद्यात किमान हमी भावाचे (MSP ) प्रावधानच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने विकला जाऊन यातून फायदा व्यापाऱ्यांचा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काची असलेल्या बाजार समित्यांच्या (APMC) अस्तित्वावरही घाला येणार आहे. कंत्राटी शेतीमुळे नवीन जमीनदारी पद्धतीला चालना मिळण्याचा धोका अधिक आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. हे शेतकरी व्यापारी व उद्योगपतींच्या समोर तग धरू शकणार नाहीत. शेतकरी भांडवलदारांच्या हातचा गुलाम बनेल. यातून शेती व शेतकरी देशोधडीला लागण्याचा धोका मोठा आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे फक्त शेतकऱ्यांचेच नुकसान होणार नाही, तर साठेबाजीला मोकळे रान मिळाल्यामुळे महागाई वाढून सामान्य लोकांना त्याचा फटका बसणार आहे. हे सर्व लक्षात घेऊनच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नविन कृषी सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले. 

विधानसभेत काल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम 2021 हे विधेयक सादर केले. तर शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण आश्वासित किंमत आणि शेतीसेवा विषयक करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021) कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आणि शेतकरी उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम 2020 हे विधेयक सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सादर केले.

शेतकरी उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) महाराष्ट्र सुधारणा अधिनियम मधील प्रमुख प्रस्तावित तरतुदीमध्ये, राज्यात कोठेही शेतमालाचा व्यापार करण्यासाठी किंवा शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडून परवाना घेणे बंधनकारक असेल. व्यापारी परवानाधारक असल्यामुळे सक्षम प्राधिकरणासमोर दाद मागता येईल. कराराच्या अटीनुसार शेतकऱ्याला देय असलेल्या तारखेपासून सात दिवसाच्या आत व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा व्यवहार पूर्ण केला नाही तर तो शेतकऱ्यांचा छळ समजला जाईल व त्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा पाच लाख रुपयां पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावण्यात येतील.

जीवनावश्यक वस्तू महाराष्ट्र सुधारणा अधिनियम प्रमुख तरतुदीमध्ये, जीवनावश्यक वस्तूंची यादी तयार करणे, साठेबाजीवर नियंत्रण या बाबी, आता केंद्राच्या जोडीने राज्य सरकारच्या अखत्यारीत असतील.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com