होम क्वारंटाईन ऐवजी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करा, पालकमंत्री मुश्रीफ यांचे आदेश - Admit patients to Kovid Center instead of Home Quarantine, orders of Guardian Minister Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

होम क्वारंटाईन ऐवजी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करा, पालकमंत्री मुश्रीफ यांचे आदेश

मार्तंड बुचुडे
बुधवार, 26 मे 2021

कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली की कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची बाधा होऊन संपुर्ण कुटुंबची कुटुंबे उद्‌वस्त झाली आहेत.

पारनेर : राज्यात कोरोना (Corona) महामारीने गेली एक वर्षाभरापासून थैमान घातले आहे. अनेकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली की कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची बाधा होऊन संपुर्ण कुटुंबची कुटुंबे उद्‌वस्त झाली आहेत. असे होऊ नये म्हणून या पुढील काळात तालुक्‍यात व जिल्ह्यातही होम क्वारंटाईन ऐवजी कोविड सेंटरमध्येच कोरोना रूग्णांना दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. (Admit patients to Kovid Center instead of Home Quarantine, orders of Guardian Minister Mushrif)

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज (ता. 26 ) भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या एकहजार शंभर बेडच्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरला भेट दिली. त्यानंतर नंदनवन मंगल कार्यालयात त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक घेतली, त्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते. 

या वेळी आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, उपविभागीय अधिकारी अजित पाटील, महावितरणचे अभियंता प्रशांत आडभाई उपस्थित होते. 

मुश्रीफ पुढे म्हणाले, की गेली वर्षभरापासून कोरोमा महामारीत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. राज्यातील महसूल, आरोग्य व पोलिस यंत्रणेने सातत्याने काम करत आहे. मात्र या यंत्रणेने थकून जाऊ नये. कारण कोरोना कधी संपेल हे अता सांगता येणार नाही, त्यामुळे कोरोनाला गाडूनच आपणस पुढे जावे लागणार आहे. 

मुश्रीफ म्हणाले, की तालुक्‍यातील सुमारे 21 गावांनी कोरोना वेशी बाहेरच रोखला आहे. त्यात ते यशस्वी झाले आहे, तसेच काम आपणास तालुक्‍यातील प्रतेक गावात करावयाचे आहे. कारण कोरोनाची तिसरी लट येण्याच शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सक्षमपणे तायारी करण्याची गरज आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका राहाणार असल्याचा तज्ञांचा आंदाज आहे. त्यासाठी आपणास तशी तयारी करणे गरजेच आहे. तसेच नव्याने आता कोरोनाबरोबर म्युकरमायकोसिस चे रूग्णही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढत आहेत, त्याचाही मुकाबला भविष्यात मोठ्या प्रमाणात आपणास करावा लागणार आहे. 

या वेळी आमदार लंके यांनी महसूल, आरोग्य व पोलिस यंत्रणा तालुक्‍यात चांगले काम करत आहे. असे सांगीतले या वेळी प्रांताधिकारी भोसले व तहसीलदार देवरे यांनी तालुक्‍यातील राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहीती दिली. 
 

हेही वाचा...

नगर जिल्ह्याने केला अडीच हजारांचा आकडा पार

 

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख