`जरांडेश्वर`वर कारवाई सुरू झाली, राज्यातील 49 साखर कारखान्यांची चौकशी व्हावी - Action has been initiated against Jarandeshwar, 49 sugar factories in the state should be investigated | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

`जरांडेश्वर`वर कारवाई सुरू झाली, राज्यातील 49 साखर कारखान्यांची चौकशी व्हावी

एकनाथ भालेकर
शुक्रवार, 2 जुलै 2021

जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना व गुरुकमोडिया कंपनी यांचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे यापूर्वीच आले होते. ती कागदपत्रे आम्ही उच्च न्यायालयात दाखल केले आहेत.

राळेगणसिद्धी : सातारा येथील जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची ईडीने कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. ईडीने गैरव्यवहार होऊन विक्री झालेल्या राज्यातील सर्व ४९ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी. राज्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. पक्ष व पार्ट्या या काय आज आहे उद्या नाहीत, मात्र सहकार चळवळ मोडीला काढणे, हा खूप मोठा धोका आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी बोलताना व्यक्त केले. (Action has been initiated against Jarandeshwar, 49 sugar factories in the state should be investigated)

माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना व गुरुकमोडिया कंपनी यांचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे यापूर्वीच आले होते. ती कागदपत्रे आम्ही उच्च न्यायालयात दाखल केले आहेत. मात्र न्यायालयाने सांगितले की तुमची तक्रार दाखल पाहिजे. त्यांनतर आम्ही मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशन इथं चार हजार पानांची तक्रार दाखल केली होती. कारखान्याची तक्रार नोंदवल्यानंतर सरकारने मात्र चौकशी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील माणसाला नियुक्त केले व त्यांनी या प्रकरणात काही तथ्य नाही, असा अहवाल सरकारला दिला.

आम्ही पुन्हा आता सत्र न्यायालयात गेलो. तेथे ही केस अजून बाकी आहे. तिथून आता एक चांगली गोष्ट झाली की ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आता ईडीने फक्त जरांडेश्वर कारखान्याची नाही, तर उरलेल्या ४९ साखर कारखान्याची चौकशी करावी. सर्व कारखान्यात अशाच प्रकारचे गैरव्यवहार झाले. त्याचे गबाळ चौकशीअंती बाहेर पडेल. त्यांचीही चौकशी ईडीने करावी, असेही हजारे यांनी स्पष्ट केले.

४९ कारखाने कवडीमोल भावाने विकले. संगमताने सर्व कारखाने कुणाला कोणता कारखाना द्यायचे, असे सर्व नियोजन करून विकण्यात आले. आता आमची विनंती एकच आहे. ईडीने या सर्व ४८ कारखान्याची चौकशी करावी. आम्हाला कुठल्याही पक्ष व पार्टीचे घेणं देणं नाही. पण महाराष्ट्र राज्य असं राज्य आहे, की ज्या राज्यात सहकार खात एवढं भरभराटीस आलं होतं. त्या सहकार खात्याचे मार्गदर्शन देशाला मिळाले होते. त्यातूनच ही सर्व सहकारी कारखान्यची चळवळ वाढली होती. त्यातूनच हे ४९ कारखाने उभं राहिले होते, असेही हजारे यांनी सांगितले.

धनंजय गाडगीळ, वैकुंठ भाई मेहता, विठ्ठलराव विखे यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविण्यासाठी मोठं काम केले. आपल्या राज्यातील सहकार चळवळीचे अनुकरण करत इतर राज्यांनी त्याचा आदर्श घेतला, मात्र आज आपल्याच राज्यात सहकार चळवळ मोडण्याचे काम सुरु आहे. याचे मला दुःख वाटत आहे.
आता ह्या राज्यात ही सहकार चळवळ मोडीत काढून खासगीकरण मागे करण्याच्या मागे लागले आहे, हा खूप मोठा धोका आहे. यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. यात ईडीने लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण बाहेर पडेल.

महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँकेची चौकशी एक दोनदा नाही, तर तेरा ते चौदा वेळा चौकशी झाली आहे. बँकेच्या ८८ संचालक यांच्याकडून वसुली निश्चित केली. पण सत्ता हातात असल्यावर काय होतं, ते आपण पहातच आहे. यात घोटाळे झाले म्हणूनच हे जे संचालक मंडळ होते, आमच्या सारखे लोकं हाय कोर्टात, सत्र न्यायालयात गेले, तेंव्हा हे संचालक मंडळ बरखास्त झाले. आम्ही जे दाखल केले त्यात काही तथ्य नाही, मग संचालक मंडळाला का बरखास्त झाले. त्यात काही तथ्य नाही मग संचालक मंडळ का बरखास्त झाले, असा सवालही हजारे यांनी या वेळी केला.

 

 

हेही वाचा...

रक्षकच झाला भक्षक

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख