कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवा : आमदार राजळे यांच्या सूचना - Accelerate Corona Vaccination: MLA Rajale | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवा : आमदार राजळे यांच्या सूचना

राजेंद्र सावंत
रविवार, 4 एप्रिल 2021

उपजिलहा रुग्णालयात आमदार मोनिका राजळे यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला या सूचना दिल्या.

पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोवीडची तपासणी व लसीकरणाऱ्यांच्या कामात वेग वाढवावा, अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या. 

येथील उपजिलहा रुग्णालयात आमदार मोनिका राजळे यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला या सूचना दिल्या. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक कराळे यांनी कोरोनाच्या लसीकरणाबाबत माहिती देऊन अडचणी सांगितल्या. 

राजळे म्हणाल्या की, कोरोनाच्या कामात हलगर्जीपणा न करता रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात. सरकारी पातळीवर जी मदत लागेल, ती पुरविली जाईल. कोरोनाच्या विरुध्दची ही लढाई सर्वांना मिळून लढावी लागेल, यासाठी जनतेनेही सहकार्य करण्याची अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या. 

मनसेचे धरणे आंदोलन 

उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या तासन् ‌तास उभे रहावे लागत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे आदी सहभागी झाले होते. मागण्या झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

 

हेही वाचा...

जिरेवाडीत आपदग्रस्त महिलेसा ग्रामस्थांची मदत

पाथर्डी : तालुक्यातील जिरेवाडी येथे अनिता किसन आंधळे यांच्या राहत्या घराला शुक्रवारी रात्री दहा वाजता शॉर्टसर्किटने आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्या आहेत.

अनिता आंधळे या सोळा वर्षाच्या मुलांसमवेत माहेरी राहत आहे. शेतमजुरी करून आपला प्रपंच चालवत आहे. आगीमध्ये घरातील सर्व वस्तू धान्य, कपडे, सोन्याचे रोज वापराचे दागिने, नोटा, भांडे, कपाट यासह संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

आगीच्या घटनेमुळे त्या हतबल झाले असतांना जिरेवाडीच्या ग्रामस्थांनी घटना घडल्यानंतर पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड व गोकुळ दौंड यांच्याशी संपर्क केला. घटनेची माहिती दिली. सभापतींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

दीपाली प्रतिष्ठानच्यावतीने दहा हजार रुपये रोख स्वरूपात देऊन गृहोपयोगी वस्तू घेण्यास मदत केली. गोकुळ दौंड यांनी आगीच्या घटनेबाबत तहसीलदार शाम वाडकर याना माहिती देऊन शासकीय भरीव आर्थिक मदत या कुटुंबियाला मिळावी, यासाठी विनंती केली आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख