चिथावणीखोर भाषण केल्याचा खटल्यातून अबू आझमी निर्दोष

शिवाजी पार्कवर झालेल्या एका सभेत आझमी यांनी हिंदी भाषेतून भाषण केले होते. फेब्रुवारी २००८ मध्ये केलेल्या या भाषणात चिथावणीखोर आणि महाराष्ट्रीयन, उत्तर भारतीय यांच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप पोलिसांनी ठेवला होता.
Abu azami.jpg
Abu azami.jpg

मुंबई : तब्बल १३ वर्षे जुन्या खटल्यातून समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांची महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अभियोग पक्षाने पुरावा म्हणून दाखल केलेली सीडी आणि कॅसेट न्यायालयात चाललीच नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

शिवाजी पार्कवर झालेल्या एका सभेत आझमी यांनी हिंदी भाषेतून भाषण केले होते. फेब्रुवारी २००८ मध्ये केलेल्या या भाषणात चिथावणीखोर आणि महाराष्ट्रीयन, उत्तर भारतीय यांच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप पोलिसांनी ठेवला होता. या आरोपाच्या पुष्ठतेसाठी सीडी आणि कॅसेट असे चार पुरावे अभियोग पक्षाने दाखल केले होते; मात्र यापैकी दोन सीडी न्यायालयात ओपन झाल्या नाहीत, तर एक सीडी ब्लँक होती.

याशिवाय एक कॅसेट आणि एका वृत्तवाहिनीची लिंक होती; मात्र तीही चालू शकली नाही. त्यामुळे या संपूर्ण आरोपांवर संभ्रम निर्माण होत आहे आणि पोलिसांनी कशाच्या आधारावर गुन्हा दाखल केला हे स्पष्ट होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

तसेच संपूर्ण भाषण हे जनतेच्या विरोधात नव्हते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात होते हे उलटतपासणीमध्ये उघड झाले आहे. पोलिसांनी लावलेली कायदेशीर कलमे किमान दहा लोकांचा समुदाय असेल तर लावता येऊ शकतात, असेही न्यायालयाने नोंदविले आहे. आझमी यांनी देश बचाओ आंदोलनात संबंधित पदयात्रा दादरमध्ये काढली होती. त्यांच्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी फलक फाडले होते, असा आरोप पोलिसांनी ठेवला होता. आझमी यांनी सर्व आरोपांचे खंडन केले होते.
 

हेही वाचा...

शहरांमध्ये फिरते अन्नछत्रालयास मदत    

नगर : लॉकडाऊनमध्ये रुग्णांइतकीच मदत हातावर पोट असलेल्या गरजूंनाही करणे आवश्यक आहे. अनेकांचे रोजगार ठप्प झाल्याने अनेकां समोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशा वेळी नगर शहरातील शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व श्री महावीर प्रतिष्ठान व आय लव नगर  संचलित फिरते अन्नछत्रालय सुरू करून अत्यल्प दरात सकस पौष्टिक जेवण देण्याचा उपक्रम चालू केले आहे, ही खरी मानवसेवा आहे. या कार्यात योगदान देताना मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन विजय पितळे यांनी केले.

गरजूंना अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व श्री महावीर प्रतिष्ठान व आय लव नगर यांच्या संयुक्त पुढाकारातून भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहमदनगर येथे फिरते अन्नछत्रालय सुरू करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी अहमदनगर होलसेल व्यापारी कापड व गारमेंट्स असोसिएशनच्या वतीने १५ हजारांची देणगी महावीर प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष हर्षल बोरा व उपाध्यक्ष चेतन भंडारी यांच्याकडे धनादेश देण्यात आला. या वेळी असोसिएशनचे पदाधिकारी विजय पितळे, निखील गांधी, घनश्याम आहुजा, दीपक कासवा, आनंद कटारिया, सागर काबरा, सतिश कुलकर्णी, राकेश भंडारी आदी उपस्थित होते.

असोसिएशनचे निखिल गांधी म्हणाले, की उद्योजक नरेंद्र फिरोदिया कायम सामाजिक बांधिलकी जपत असतात व कोरोनाच्या महामारीत अनेकांसाठी त्यांची मदत लाखमोलाची ठरत आहे. महावीर प्रतिष्ठानही या कार्यात नेहमी सक्रिय आहे. अशा कार्याला भविष्यातही मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com