नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले 85 कोटी, पहा कोणते रस्ते होणार - 85 crore for roads in Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले 85 कोटी, पहा कोणते रस्ते होणार

मुरलीधर कराळे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील रस्त्याच्या विकासासाठी 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील रस्त्याच्या विकासासाठी 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातील नगर दक्षिण मतदार संघासाठी 47 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्‍यातील सोनगाव ते चांदेगाव रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख, खरशिंदें ते मांजरी रस्त्यासाठी 3 कोटी 94 लाख, वरशिंदे ताराबाद ते मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी 73 लाख असे 11 कोटी 59 लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला, शेवगाव तालुक्‍यातील खानापूर ते ठाकूर निमगाव रस्त्यासाठी 2 कोटी 73 लाख, पाथर्डी तालुक्‍यातील धमनगाव, मढी ते कोरडगाव, मालेगाव रस्त्यासाठी 12 कोटी 88 लाख, पारनेर तालुक्‍यासाठी गोरेगाव डिसाळ लोणी हवेली, शहांनजापूर सुपा रस्त्यासाठी 3 कोटी 98 लाख, कर्जत तालुक्‍यातील अरणगाव, वाळकी, देऊळगाव खांडवी रुईगव्हाण, कुलधरण, बरडगावन सुद्रीक ते राज्य महामार्ग 54 रस्त्यासाठी 3 कोटी 95 लाख, श्रीगोंदे तालुक्‍यातील राष्ट्रीय महामार्ग 161 ते काष्टी, मांडवगणच्या रस्त्यासाठी 12 कोटी 65 लाख असे 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  

केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे आपण नगर जिल्ह्यातील जनतेतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो. नगर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहचेल.

 

हेही वाचा...

नाशिक-पुणे महामार्गासाठी सव्वाचोवीस कोटी 

संगमनेर : संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासह सुशोभीकरणासाठी 24 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. 

संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर खुर्द, बस स्थानक ते अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या परिसरात वाहतुकीची मोठी वर्दळ असते. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सर्वप्रथम नऊ किलोमीटरचा बायपास मंजूर करून घेतला. त्यानंतर नाशिक ते पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही पूर्ण झाले. जिल्ह्याबाहेरची वाहतूक बाह्यवळण रस्त्याने होत असली, तरी शहरासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने त्यावर कायमच वर्दळ असते. शहरातील या रस्त्याच्या चौपदरीकरण व सुशोभीकरणासाठी थोरात यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. आज केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे संगमनेर खुर्द, दिल्ली नाका, बसस्थानक ते अमृतवाहिनी अभियांत्रीकी महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक, विद्युत रोशनाई व दुतर्फा पादचारी मार्ग होणार आहे. या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख