नगरमध्ये रुग्णसंख्या निच्चांकी एक हजारांच्या आत, मृत्यू मात्र 45 - 45 The number of patients in the city is less than one thousand, but the death toll is 45 | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये रुग्णसंख्या निच्चांकी एक हजारांच्या आत, मृत्यू मात्र 45

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 मे 2021

जिल्ह्यातील संगमनेर या एकमेव तालुक्‍यात 137 बाधित रुग्ण आज आढळून आले. शंभरीपेक्षा जास्त रुग्ण असलेला संगमनेर हा जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे.

नगर : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सरासरी 50 रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे. सोमवारी (ता. 31) कोरोनाच्या 45 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजार 218 झाली आहे. नव्याने 912 रुग्णआंची वाढ झाली आहे. (The number of patients in the city is less than one thousand, but the death toll is 45)

जिल्ह्यातील संगमनेर या एकमेव तालुक्‍यात 137 बाधित रुग्ण आज आढळून आले. शंभरीपेक्षा जास्त रुग्ण असलेला संगमनेर हा जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे. कोपरगाव व कर्जत तालुक्‍यांत सर्वांत कमी, अवघे 26 रुग्ण आढळून आले. 

जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 223, खासगी रुग्णालयातील प्रयोगशाळेत 359, रॅपिड अँटिजेन चाचणीत 330 जण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या यामुळे दोन लाख 62 हजार 135 झाली आहे. 
दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या एक हजार 846 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत एक हजाराने घट झाली आहे. दहा हजार 884 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 48 हजार 33 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के झाले आहे. 

बाधितांची तालुकानिहाय संख्या 

संगमनेर 137, नेवासे 81, शेवगाव 78, श्रीरामपूर 70, नगर तालुका 63, पारनेर 59, अकोले 57, श्रीगोंदे 55, जामखेड 49, नगर शहर 45, राहाता 42, राहुरी 40, पाथर्डी 38, कोपरगाव व कर्जत प्रत्येकी 26, भिंगार छावणी परिषद 2, परजिल्ह्यांतील 12, तसेच परराज्यांतील 32 रुग्णांचाही यात समावेश आहे. 

लॉकडाउन शिथिल होण्याची व्यापाऱ्यांना प्रतीक्षा 

महापालिकेकडून शहरात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे. अशा स्थितीत मागील 20 दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख झपाट्याने घसरत आहे. 12 मेपूर्वी शहरात 250 पेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण रोज आढळत होते. आता ही संख्या 50च्याही खाली आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला व सामान्य नागरिकांना लॉकडाउन शिथिल होण्याची अपेक्षा आहे. 

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एप्रिलमध्ये व मे महिन्याच्या मध्यापर्यंत झपाट्याने वाढत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नगर शहरात उग्र रूप धारण केले होते. अशा स्थितीत पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत महापालिकेच्या सहकार्याने शहरात विशेष मोहीम राबविली. रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येऊ लागली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व महापालिका आयुक्‍त शंकर गोरे जरी आपल्या केबिनमधून बाहेर पडू शकले नसले, तरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील मात्र शहरातील रस्त्यांवर उभे राहून कारवाईचा बडगा उगारत होते. 

 

हेही वाचा..

फुकट मिळेना, तर लस विकत घ्या

 

 

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख