कोरोना रुग्णांची संख्या घटेना ! आज आढळले 374 - 374 The number of corona patients did not decrease! Found today 374 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कोरोना रुग्णांची संख्या घटेना ! आज आढळले 374

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 जून 2021

जिल्ह्यात आतापर्य़ंत बरे झालेली रुग्ण संख्या २,६९,८५७ आहे. सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण २३९२ आहेत.

नगर : जिल्हा अनलाॅक झाल्यानंतर कोरोना (Corona) रुग्णांची संख्या जैसे थे आहे. रुग्णसंख्या घटत नसल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण होऊ लागले आहे. आज जिल्ह्यात 374 रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे कमी असले, तरी रुग्णसंख्या घटत नाही. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊनची भीती व्यक्त होत आहे. (The number of corona patients did not decrease! Found today 374)

जिल्ह्यात आतापर्य़ंत बरे झालेली रुग्ण संख्या २,६९,८५७ आहे. सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण २३९२ आहेत. पोर्टलवरील मृत्यू नोंद ५८३० अशी असून, एकूण रूग्ण संख्या २,७८,०७९ आहे.

जिल्ह्यात आज ६०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६९ हजार ८५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ३९२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३८ आणि अँटीजेन चाचणीत २१८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १, अकोले १, कर्जत २, नगर तालुका ५, पारनेर १, पाथर्डी १, संगमनेर ६ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६, अकोले २, जामखेड २, कर्जत १, कोपरगाव १, नगर तालुका ११,  नेवासे १२, पारनेर ६, पाथर्डी १६, राहाता ७, राहुरी १८, संगमनेर १३, शेवगाव १९, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, अकोले १८, जामखेड १७, कर्जत १४, कोपरगाव ३०, नगर तालुका ५५, नेवासे २९, पारनेर ९१, पाथर्डी ५५, राहता ४४, राहुरी ३३, संगमनेर २८,  शेवगाव ३१, श्रीगोंदे ३३, श्रीरामपूर ३५, कॅंटोन्मेंट बोर्ड ३ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

हेही वाचा...

साई संस्थानच्या विश्वस्तांचा तिढा

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख