आमदार आशुतोष काळेंच्या फटाक्यांना 15 दिवसांचा अवधी - 15 days for MLA Ashutosh Kale's firecrackers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आमदार आशुतोष काळेंच्या फटाक्यांना 15 दिवसांचा अवधी

मुरलीधर कराळे
बुधवार, 23 जून 2021

साईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. हे पद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार, हेही जवळजवळ निश्चित होते.

नगर : शिर्डीतील साईबाबा (Saibaba Sansthan) संस्थानच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची निवड निश्चित झाली आहे. मात्र औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने ही निवड प्रत्यक्षात होण्यास 15 दिवसांचा अवधी आहे. काल महाविकास आघाडी सरकारने काळे यांचे नाव निश्चित केल्याने कोपरगावमध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली. परंतु प्रत्यक्षात पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. (15 days for MLA Ashutosh Kale's firecrackers)

साईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. हे पद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार, हेही जवळजवळ निश्चित होते. त्यामुळे आमदार काळे यांचे नाव पुढे येत होते. नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकित काॅंग्रेसकडे पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराचे अध्यक्षपद गेले. शिर्डीचे हे पद राष्ट्रवादीला मिळाल्याने या विषयाला पुष्टी मिळाली. नवीन विश्वस्त मंडळाची नावेही आघाडीने जाहीर केले. त्यामुळे कोपरगावात फटाक्यांची आतिषबाजी झाली. असे असले, तरी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात नवीन विश्वस्त मंडळ निवडीबाबत याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीला प्रत्यक्ष 15 दिवसांचा अवधी आहे.

शिर्डीतील साईसंस्थान जगभर प्रसिद्ध आहे. परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे संस्थानच्या वतीने शिर्डीत सुविधा देणे, भाविकांची लूट होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देणे, राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधांसाठी उपाययोजना करणे, स्थानिक व्यावसायिकांचे प्रश्न असे अनेक प्रश्न देवस्थानाजवळ निर्माण होत असतात. त्याची सोडवणूक करण्यासाठी अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक आपत्कालिन परिस्थितीत देवस्थानच्या वतीने राज्य सरकारला मोठी देणगी दिली जाते. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.

अध्यक्ष स्थानिकच म्हणजे नगर जिल्ह्यातीलच असावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक तसेच भाविकांतून होत होती. त्यानुसार हे पद आता काळे यांच्या रुपाने स्थानिकांना मिळणार आहे.

 

हेही वाचा..

साईसंस्थानचे संभाव्य विश्वस्त

 

हेही वाचा..

जयंत पाटील यांची मोठी ओवाळणी

 

हेही वाचा..

काळे यांचे नाव येताच कोपरगावात आतिषबाजी

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख