‘महापालिका आयुक्त साहेब खड्डा’, नगरमधील खड्ड्यांचे नामकरण - ‘Municipal Commissioner Saheb Khadda’, naming of pits in the town | Politics Marathi News - Sarkarnama

‘महापालिका आयुक्त साहेब खड्डा’, नगरमधील खड्ड्यांचे नामकरण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत.

नगर : शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण होत असल्याने युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या संकल्पनेतून जुन्या महापालिका कार्यालयाजवळील बेग पटांगणासमोरील रस्त्यावरील खड्ड्यांचे, ‘महापालिका आयुक्त साहेब खड्डा’ असे नामकरण करण्यात आले. (‘Municipal Commissioner Saheb Khadda’, naming of pits in the town)

या वेळी सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष योगेश दिवाणे, युवक काँग्रेसचे योगेश काळे, विशाल कळमकर, आशिष गुंदेचा, प्रमोद अबूज, अक्षय शिंदे, ईश्वर जगताप, अजय मिसाळ, महिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, सुनीता बागडे आदी उपस्थित होते.

 

हेही वाचा..

सामान्यांची मदत हीच खरी जनसेवा - निलेश लंके

पारनेर, ता. २० ः सरकारच्या विविध योजणेचा लाभ सामान्य जनतेपर्यंत मिळवून देणे हेच खरे राजकीय नेत्यांचे काम असते. सामान्यांची मदत हीच खरी जनसेवा आहे. त्याच हेतूने एकात्मिक आदिवासी विकास योजणे अंतर्गत तालुक्यातील एक हजार ३१४ लाभार्थ्यांना सुमारे ५२ लाख रुपयांची मदत मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
सुपे येथे एकात्मिक आदिवासी विकास अंतर्गत खावटीचे धान्य किट वाटप करताना लंके बोलत होते. या वेळी वाळवण्याचे सरपंच सचिन पठारे, सुप्याचे माजी सरपंच राजू शेख, संदीप मगर, भाऊसाहेब भोगाडे, सचिन पवार, तालुका समन्वयक अशोक काळे व सुजाता शेरखाने विजय पवार, विक्रम कळमकर, किरण पवार, शरद पवार, भास्कर पवार, मनोज बाफना, ईश्वर भोसले आदी उपस्थित होते. मनोज बाफना यांनी आभार मानले.

 

हेही वाचा..

नगर - बीड जिल्ह्याबाबत मोठा निर्णय

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख