जिल्हा बॅंक ; शिवाजी कर्डिले यांचा दणदणीत विजय, गुलालाची पोती अखेर कामी आली - Shivaji Kardile Won Nagar District Bank Election | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंक ; शिवाजी कर्डिले यांचा दणदणीत विजय, गुलालाची पोती अखेर कामी आली

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

जिल्हा बॅंकेच्या शनिवारी (ता. 20)ला चार जागांसाठी मतदान झाले. त्याची आज (रविवारी) मतमोजणी झाली. यामध्ये सेवा सोसायटी मतदारसंघातील कर्जतमधून अंबादास पिसाळ, पारनेरमधून उदय शेळके, नगरमधील माजी आमदार शिवाजी कर्डिले व बिगरशेती मतदार संघातून पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड विजयी झालेले आहेत.

नगर : जिल्हा बॅंकेच्या शनिवारी (ता. 20)ला चार जागांसाठी मतदान झाले. त्याची आज (रविवारी) मतमोजणी झाली. यामध्ये सेवा सोसायटी मतदारसंघातील कर्जतमधून अंबादास पिसाळ, पारनेरमधून उदय शेळके, नगरमधील माजी आमदार शिवाजी कर्डिले व बिगरशेती मतदार संघातून पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड विजयी झालेले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये 17 जागा अर्ज माघारीच्या शेवटच्याच दिवशी झाल्या होत्या. चार जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान झाले. यामध्ये नगर तालुका सेवा सोसायटी मतदार संघात माजी आमदार शिवाजी कर्डिले व सत्यभामाबाई बेरड यांच्या लढत झाली. यामध्ये माजी आमदार कर्डिले यांना 94 तर बेरड यांना 15 मते मिळाल्याने कर्डिले यांना विजयी घोषीत करण्यात आले.

पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातील लढत उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात झाली. यामध्ये भोसले यांना अवघी सहा मते तर शेळके यांना 99 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. कर्जत सेवा सोसायटीची निवडणूक अंबादास पिसाळ व मीनाक्षी साळुंके यांच्यात झाली. यामध्ये साळुंके यांना 36 तर पिसाळ यांना 37 मते मिळाली. अवघ्या एकामताने पिसाळ यांचा विजय झालेला आहे.

हे देखिल वाचा - मला बिनविरोध होऊ न देण्यासाठी काही पुढारी लढले

बिगरसेवा सोसायटी मतदार संघात पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व दत्तात्रय पानसरे यांच्यात लढत झाली. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये दत्तात्रय पानसरे यांना 574 तर गायकवाड यांना 763 मते मिळाली. यामध्ये गायकवाड विजयी झालेले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सेवासोसायटी मतदार संघाची मतमोजणी झाल्यानंतर बिगर शेती मतदार संघाची मतमोजणी सुरु झाली. या मतदार संघातील लढत सभापती प्रशांत गायकवाड व दत्तात्रय पानसरे चुरशीची झाली. यामध्ये प्रशांत गायकवाड विजयी झाले आहेत. सेवा सोसायटी मतदार संघात माजी आमदार शिवाजी कर्डिले, उदय शेळके व अंबादास पिसाळ विजयी झालेले आहेत.

बिनविरोध निवडून आलेले संचालक  ः सीताराम गायकर, अमोल राळेभात, विवेक कोल्हे, शंकरराव गडाख, मोनिका राजळे, आण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, आशुतोष काळे, अमित भांगरे, करण ससाणे, गणपतराव सांगळे, अनुराधा नागवडे, आशा तापकीर.
 
मतदानातून विजयी झालेले उमेदवार
  : माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, अंबादास पिसाळ, उदय शेळके, प्रशांत गायकवाड.

बिगरशेती मतदारसंघात चार मते बाद
बिगरशेती मतदार संघात एकूण एक हजार 341 मतदान होते. त्यपैकी एक हजार 337 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये प्रशांत गायकवाड यांना 763 तर दत्तात्रय पानसरे यांना 574 मते पडलेली असून चार मते बाद झालेली आहे. अकोले, कर्जत, कोपरगाव, नगर या मतदारसंघात प्रत्येकी एक मत बाद झालेले आहे. 

Edited By - Amit Golwalkar

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख