उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात गुप्तभेट; राजकीय वर्तुळात खळबळ    - Secret meeting between Deputy Chief Minister Ajit Pawar and Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात गुप्तभेट; राजकीय वर्तुळात खळबळ   

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 13 जून 2021

या दोन्ही नेत्यामध्ये झालेली बैठक राज्याच्या राजकारणाशी निगडीत होती.

राशीन : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात शनिवारी (ता.१२ जून) कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अर्धा तास गुप्त बैठक झाल्याची चर्चा कर्जत तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र, हि बैठक कोणत्या विषयावर होती हे समजू शकले नाही. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. (Secret meeting between Deputy Chief Minister Ajit Pawar and Ram Shinde)

हे ही वाचा : मोदी सरकारच्या 7 वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के तर डिझेलवरील करात 600 टक्के वाढ

या दोन्ही नेत्यामध्ये झालेली बैठक राज्याच्या राजकारणाशी निगडीत होती. कि कर्जत-जामखेड मतदारसंघाशी, अथवा आगामी लक्षवेधी राजकीय घडामोडीबाबत या बैठकीत नेमकी कोणती डाळ शिजली याचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिले आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अजित पवार व प्रा. शिंदे या दोघांमध्ये अंबालिका साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत बैठक झाली. 

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला आहे. आमदार रोहित पवार व  राम शिंदे यांच्या समर्थकांकडून कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध प्रश्नावर एकमेकांना लक्ष्य केले जात असते. असे, असताना हि बैठक कोणती खिचडी शिजवण्यासाठी झाली असेल याची उत्सुकता पवार व शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना लागली आहे.

हे ही वाचा : खेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूनिका महागात
 

शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जात असल्याने त्यांचा काही निरोप घेऊन अजित पवारांना भेटले असतील काय, ही भेट राज्यातील घडामोडीची नांदी तर नसेल अशा चर्चांना उधाण आले आहे. या भेटीबाबत राम शिंदे यांना विचारले असता त्यांनी अशी कोणतीही बैठकच झाली नसल्याचे सांगत पवार -शिंदे भेटीच्या वृत्ताचे खंडन केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख