'त्यांना' आंबेडकरवादी का म्हणायचे? आठवलेंचा सवाल - Ramdas Athavale Criticism on Vanchit Aghadi Leader Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

'त्यांना' आंबेडकरवादी का म्हणायचे? आठवलेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष सोडुन अन्य नावाचे पक्ष चालविणारे लोक आंबेडकरवादी आहेत का, असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.  वंचित आघाडी चे नेते  प्रकाश आंबेडकर यांचे  नाव न घेता ना रामदास आठवले यांनी त्यांना हा टोला लगावला

शिर्डी : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष सोडुन अन्य नावाचे पक्ष चालविणारे लोक आंबेडकरवादी आहेत का, असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.  वंचित आघाडी चे नेते  प्रकाश आंबेडकर यांचे  नाव न घेता ना रामदास आठवले यांनी त्यांना हा टोला लगावला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे रिपब्लिकन पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत रिपब्लिकन ऐवजी वंचित बहुजन आघाडी या नावाने पक्ष चालविणार असल्याचे जाहीर केले होते. 

इतर कोणी त्यांच्या पक्षातून रिपब्लिकन नाव पुसून टाकले असले तरी मी रिपब्लिकन पक्ष जीवंत ठेवणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा मजबूत करण्याचे काम आपण देशभर करीत असून महाराष्ट्रातही रिपब्लिकन पक्ष सर्वसमावेशक होत आहे.राजकीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी 10 जानेवारी पर्यंत पूर्ण करून 26 जानेवारी पर्यंत पक्षांतर्गत निवडणुका पूर्ण कराव्यात असे आवाहन आठवले यांनी केले.

शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड येथे रिपाइं च्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशची विभागीय बैठक घेण्यात आली त्यात आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ.सीमाताई आठवले; कुमार जित आठवले ; तसेच रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; श्रीकांत भालेराव; रमेश माकसरे; राजा कापसे; जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात;प्रकाश लोंढे; सौ. शिलाताई गांगुर्डे;अनिल गांगुर्डे; श्रावण वाघमारे;विजय वाकचौरे;सुनील साळवे;  रमेश गायकवाड; चंद्रकांत कसबे; भीमा बागुल; चांगदेव जगताप;मंदाबाई पारखे; आशिष बुराडे;  माधुरी भोळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

सरकारी पडीक गायरान जमिनी ताब्यात घेऊन अतिक्रमण करण्याचे भूमीहीनांचे आंदोलन उभारण्याची गरज आहे. भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन मिळाली पाहिजे या मागणीसाठी लवकरच भूमीहीनांचे आंदोलन उभारा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. जनतेच्या विविध प्रश्नांवर रिपाइं कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे असे आवाहन आठवले यांनी यावेळी केली. कार्यकर्त्यांनी रिपाइं व्यपक करताना स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जागृत राहून शासकीय योजनांचा लाभ घेऊन रोजगार प्रकल्प उभरावेत.औद्योगिक सहकारी संस्था उभाराव्यात असेही आठवले म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख