डॉ. सुजय विखेंच्या त्या बॉक्समध्ये काय होते! - NCP's women state president Rupali Chakankar criticizes MP Sujay Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. सुजय विखेंच्या त्या बॉक्समध्ये काय होते!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 एप्रिल 2021

एका कंपनीतून रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन खासगी विमानाने ते आले. विमानातूनच त्या वेळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून ठेवला होता. नंतर तो सोशल मीडियावर टाकला होता. 

नगर : जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असताना, भाजपचे खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन, खासगी विमानाने दिल्ली येथून रेमडेसिव्हिर इंजेक्शन नगरमध्ये आणले असल्याचे म्हटले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.  

या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे'', असल्याचे म्हणत चाकणकर यांनी टीका केली आहे.

''एकतर सुजय विखेंच्या त्या बॉक्स मध्ये काय होते, हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हिर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी'', अशी मागणीही चाकणकर यांनी केली आहे. 

दरम्यान, डॅा. सुजय विखे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये (ता. 19 एप्रिल) रोजी त्यांनी दिल्लीला गुपचूप वारी केली. तेथील एका कंपनीतून रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन खासगी विमानाने ते आले. विमानातूनच त्या वेळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून ठेवला होता. नंतर तो सोशल मीडियावर टाकला होता. 

हे ही वाचा : अशी ही भाऊबंदकी : आमदार काकाचे करिअर उद्धवस्त करण्यासाठी पुतण्याचाच डेंजर डाव!
 

सोशल मीडियावर टाकललेल्या व्हिडिओमध्ये विखे पाटील म्हणाले होते की, माझ्या परीने जमेल ती मदत मी नगर जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण मुले तडफडून मरताना पाहत आहे. ते मला पाहवत नाही. मला ज्यांनी खासदार केले, निवडून दिले, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये पैसा कमावण्याचा कोणाचाच उद्देश नाही. लोकप्रतिनीधी म्हणऊन हे करणे आमची जबाबदारी आहे. याबाबत मला समाधान आहे, की मी हे इंजेक्शन आणू शकलो.

माझ्या मनात पाप नाही. मी तेथील फॅक्टरीत गेलो. तेथे माझ्या मैत्री-संबंधाचा वापर केला. मदत घेतली आणि ही औषधे घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही, हे माहित नाही. खासगी विमानाने ही औषधे आणली आहेत. माझ्या मनात पाप नाही. त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही डॅा. विखे पाटील यांनी म्हटले होते.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख