इंदोरीकर महाराजांविरोधात आज पहिली सुनावणी

पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला किर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टिका झाली होती. दोन तासांच्या किर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते, असे सांगत इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडून शेती करेल, असे नंतर एका कीर्तनात सांगितले होते.
Hearing Against Indorikar Maharaja to Beging Today at Shirdi Court
Hearing Against Indorikar Maharaja to Beging Today at Shirdi Court

शिर्डी : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानाबाबत आज संगमनेर न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे.  पूत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आज संगमेर सत्र न्यायालयात याबाबतची पहिली सुनावणी होत आहे. न्यायाधीश कोळेकर यांच्या पुढे ही सुनावणी होणार असन याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.  आज या सुनावणीत नक्की काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी संगमनेर न्यायालयात होणार आहे. त्यांची आपल्या विधानाबाबत केलेला खुलासा जिल्हास्तरीय समितीने यापूर्वीच फेटाळला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही केला होता. 

पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला किर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टिका झाली होती. दोन तासांच्या किर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते, असे सांगत इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडून शेती करेल, असे नंतर एका कीर्तनात सांगितले होते.  निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्या कथित वक्तव्याच्या मुद्द्यासंदर्भात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली सीडी सायबर सेलकडे पाठविण्यात आली होती. 

प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्यांच्या किर्तनातून एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे विधान त्यांनी एका किर्तनातून केले होते. त्यावेळी त्यांच्यावर टिका झाली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही नगरला येऊन इंदोरीकर महाराजांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तृप्ती देसाईंचे समर्थक व इंदोरीकर महाराजांचे समर्थक यांच्यात शाब्दिक वाद पेटला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com