निवडून येण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांनाच आमदार लहामटे विसरले : राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा आरोप

आमदार किरण लहामटे यांना प्रशासनाचा अभ्यास कमी आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दीपक वैद्य यांनी प्रसिध्दी पत्रक काढून लावला आहे.
Kiran Lahamate .jpg
Kiran Lahamate .jpg

अकोले : आमदार किरण लहामटे यांना प्रशासनाचा अभ्यास कमी आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दीपक वैद्य यांनी प्रसिध्दी पत्रक काढून लावला आहे. वैद्य हे अशोकराव भांगरे यांचे कट्टर समर्थक आहेत. एक वर्षापूर्वी राजूर येथे पक्ष पदाधिकारी निवडीवरून लहामटे व वैद्य यांची बाचाबाची झाली होती.

वैद्य यांनी आमदार लहामटे यांना प्रशासन घाबरत नाही. म्हणून या तालुक्यातल्या विकास कामांची अडचण निर्माण होत आहे. असे स्पष्ट करून तालुक्यातल्या जनतेने आपल्याला विकास कामांसाठी भरघोस मतांनी आमदार केले आणि ते तर फक्त स्वतःचाच विचार करतात. असा दावा केला आहे. कोल्हार घोटी रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला का घाबरत नाही? कोल्हार घोटी रस्त्याच्या कामाच्या संदर्भात माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांना आमरण उपोषण का करावा लागले? कारण रस्त्याचे झालेले काम दर्जेदार नसल्यामुळे आमरण उपोषण करण्याची वेळ आली. 

मग जनतेचे लोकप्रतिनिधी तालुक्यात काय करतात? कोल्हार घोटी रस्त्याकडे माजी सभापती मारूती मेंगाळ यांना लक्ष घालावे लागते. दर्जेदार काम होत नाही म्हणून उपोषण करावे लागते. ही दुर्दैवी घटना आहे. असे त्यांनी म्हटले आहे. उपोषणाच्या वेळी आपण स्वतः तिथे उपस्थित होतो. त्यावेळेस स्वतः आमदार उपोषण स्थळापासून गेले. तरी आमदार गाडी उभी करून उपोषणस्थळी भेट देऊ शकत नाही. मग या आमदारांचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे संबंध तरी कोणत्या पद्धतीचे आहेत? हे जनतेला समजले पाहिजे. अशी मागणी वैद्य यांनी केली आहे.

ज्या मारूती मेंगाळ यांनी विधानसभेच्या वेळेस स्वतः आमदार किरण लहामटे यांना निवडून आणण्यामध्ये खारीचा वाटा उचलला होता. तरीसुद्धा ज्या माणसाने स्वतःचा शिवसेना विचार व पक्ष न बघता या तालुक्यात परिवर्तन व्हावे म्हणून किरण लहामटे यांना निवडून आणले. तो पण विसर आमदारांना पडला का? असा टोला पत्रकात लगावला आहे. जनता वेडी नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला उमेदवारी मिळवून देण्यात व निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या आढावा बैठकीपूर्वी प्रोटोकॉल म्हणून त्यांचे स्वागत सुद्धा करायला उपस्थित नव्हता. असे वैद्य यांनी  म्हटले आहे.

तालुक्यातल्या 70 टक्के लोकांचा विश्वास आपण गमावला आहे. यापूर्वी जेवढा विकास झाला, त्यातला 2% सुद्धा विकास आपण करू शकलेला नाहीत. एमआयडीसी, तोलार खिंड,व अन्य समस्या सोडविण्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करून विकास करण्यासाठी मनात जिद्द असावी लागते. समाजाची जाणीव असावी लागते. प्रशासनाचा अभ्यास असावा लागतो. अशी ग्वाही देत आपल्या मध्ये कोणताच गुण दिसत नाही, अशी टीका वैद्य यांनी केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com