बाळासाहेब थोरात यांच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ  - Balasaheb Thorat held a corona review meeting in Akole taluka | Politics Marathi News - Sarkarnama

बाळासाहेब थोरात यांच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. 

अकोले : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातल्याने, बैठकी मधून त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी बाहेर काढले. जिल्ह्यातील कोरोना संदर्भात थोरात यांनी अकोले पंचयत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. 

यावेळी बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी मालुंजकर यांनी तुमच्या संगमनेर मध्ये जास्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन कसे मिळतात? आणि अकोले तालुक्याला कमी का मिळतात असा अन्याय का? असा सवाल मालुंजकर यांनी थोरातांना केल्याने बैठकीमध्ये काहीकाळ चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळात अखेर पोलिसांना हस्तक्षेप करत मालुंजकर यांना पंचायत समितीच्या बैठकीच्या सभागृहाततून बाहेर काढावे लागले.

भालके, आवताडे यांनी निवडणुकीनंतरही जपले कार्यकर्त्यांशी नाते

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रोज नवा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आढावा बैठक घेतली.

हे ही वाचा...

नगरमध्ये जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या बैठकित निर्णय

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रोज नवा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित कठोर निर्णय झाले. त्यानुसार येत्या 14 दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप नेत्यांसाठी नवीन कायदा आलाय का? जयंत पाटलांनी फडणवीस, दरेकरांना सुनावले
 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी या वेळी उपस्थित होते. जनता कर्फ्यूचे नियम लवकरच जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरण कक्षात राहण्यास परवानगी होती. त्यामुळे कुटुंबे बाधित होऊ लागली आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) राहणे सक्‍तीचे केले जाणार आहे. 

थोरात म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाल्यावर सात दिवसांनी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे कोरोनाबाधितांकडून इतरांना वेगाने संसर्ग होत आहे. कडक "जनता कर्फ्यू'चे पालन केल्यानंतर 14 दिवसांनी रुग्णसंख्या कमी होईल. त्यासाठी प्रत्येकाने "कर्फ्यू'ला साथ देण्याची गरज आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख