भाजपचे आमदार फोडण्याएवढी शक्ती अजितदादांत नाही : चंद्रकांत पाटील

उपमुख्यमंत्री अजितदादांनी राज्य चालवावे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करू. ते सध्या बोलत आहेत, तसे जाहिरपणे बोलून आमदार फोडले जातात का. आम्ही देखील तसे म्हणू शकतो.
Ajit Pawar does not have the power to blow up BJP MLAs
Ajit Pawar does not have the power to blow up BJP MLAs

शिर्डी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझे चांगले मित्र व कार्यक्षम नेते आहेत. सकाळी सात वाजता ते जनतेसाठी उपलब्ध असतात. मात्र भाजपचे आमदार फोडण्याएवढी शक्ती त्यांच्यात नाही. तसे असते, तर आमच्या 80 तासाच्या सरकारसाठी ते जेवढे आमदार सोबत घेऊन आले ते त्यांना टिकवता आले असते. त्यांनी आमचे आमदार फोडणार, अशी गमतीशीर विधाने करू नयेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

आज सायंकाळी त्यांनी येथे येऊन साईसमाधिचे दर्शन घेतले. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे व गजानन शेर्वेकर आदिंनी त्यांचे साई प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजितदादांनी राज्य चालवावे. आम्ही विरोधीपक्ष म्हणून काम करू. ते सध्या बोलत आहेत, तसे जाहिरपणे बोलून आमदार फोडले जातात का. आम्ही देखील तसे म्हणू शकतो. राज्यात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन लढविल्या, तर निकालावर त्याचा परिणाम होईल का. असे विचारले असता ते म्हणाले, की एक अधिक एक अधिक एक यांची बेरिज तिन होते. याचा अर्थ सरळ आहे, हे तीन राजकीय पक्ष एकत्र आले, तर त्यांना त्याचा ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा होईल. मात्र भाजप ताकदीनीशी या निवडणुका लढविणार आहे.

चंद्रकांतदादांनी उडविली संजय राऊत यांची खिल्ली

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आरे कारशेडबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावर केलेल्या भाष्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की कोण संजय राऊत. तुम्ही अतिक्रमण करायचे. त्याविरोधात न्यायालयात जायचे नाही का. न्यायालयाने निकाल द्यायचा नाही का. दिला तर तो तुम्हाला मान्य नाही का. देशात घटनेनुसार केंद्र राज्य सबंध, न्यायालये आणि कायदे, अशी रचना तयार करण्यात आली. ती तुम्हाला मान्य आहे की नाही.

अधिक मते तोच विजयी

पुणे पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवाराला एक लाख विस हजार मते मिळाली. याचा अर्थ तिन राजकीय पक्षांना प्रत्येकी त्रेचाळीस हजार मते मिळाली. भाजपला एकट्याला त्र्यहत्तर हजार मते मिळाली. मात्र निवडणुकीच्या राजकारणात असे विश्लेषण करून चालत नाही. अधिक मते मिळवतो तो विजयी होतो.

मी `उठा` किंवा `शपा` म्हणणार नाही

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते एकमेकांना ट्रोल करताना मर्यादा पाळत नाहीत. मला `चंपा` म्हटलं गेलं. आम्ही मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना `उठा` किंवा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना `शपा` असे कधीही म्हणणार नाही. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ट्रोल करणारांना फटकारले. Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com