श्रीगोंदा बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या - Shrigonda market committee director's son commits suicide | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंदा बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 2 जानेवारी 2021

माजी मंत्री व श्रीगोंदा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे निष्ठावंत समर्थक असलेले लक्ष्मण नलगे यांचे दौंड शहरात वास्तव्य आहे.

दौंड : श्रीगोंदा (जि. नगर) बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे धाकटे सुपुत्र दादासाहेब लक्ष्मण नलगे (वय ३७) यांनी दौंड शहरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस उपअधीक्षक कार्यालयाशेजारील इमारतीत आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. 
                    
दौंड शहरातील  पोलिस उपअधीक्षक कार्यालयाशेजारील तारामोती अपार्टमेंटमधील लक्ष्मण नलगे यांच्या सदनिकेत २ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी हा प्रकार घडला. दादासाहेब लक्ष्मण नलगे यांनी शयनकक्षात स्वतःच्या रिव्हॅाल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
                   
दौंड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पार्थिव विच्छेदनासाठी दौंड उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक फौजदार दिलीप भाकरे यांनी दिली. 
                   
माजी मंत्री व श्रीगोंदा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे निष्ठावंत समर्थक असलेले लक्ष्मण नलगे यांचे दौंड शहरात वास्तव्य आहे. दौंड व श्रीगोंदा तालुक्यात त्यांचे वाळू, हॅाटेल, मंगल कार्यालय, ट्रान्सपोर्ट आदी व्यवसाय आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख