आमदारांना अडविणारा पीआय ५० हजारांच्या लाचप्रकरणी निलंबित 

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील अकोले आमदार डॉ. किरण लहामटे यांना मांजरी बुद्रूक (ता. हवेली, जि. पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारावर ताटकळत ठेवणारे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना एकाकडून पन्नास हजार रुपये घेतले; म्हणून आज (ता. ३० जुलै) निलंबित करण्यात आले आहे.
Police inspector suspended for accepting bribe of Rs 50,000
Police inspector suspended for accepting bribe of Rs 50,000

पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्यातील अकोले आमदार डॉ. किरण लहामटे यांना मांजरी बुद्रूक (ता. हवेली, जि. पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रवेशद्वारावर ताटकळत ठेवणारे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांना एकाकडून पन्नास हजार रुपये घेतले; म्हणून आज (ता. ३० जुलै) निलंबित करण्यात आले आहे. लॉकडाउन काळात खासगी बस सोडायला मध्यस्थामार्फत ५० हजार रुपये घेतल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र, नगर, पुणे, नांदेड

मांजरी बुद्रूक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला आलेले अकोलेचे आमदार किरण लहामटे यांना त्यावेळी पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी बराच वेळ प्रवेशद्वारावर थांबवून ठेवले होते. मात्र, सामाजिक कार्यातून राजकारणात आलेल्या आमदार लहामटे यांनी त्याबाबत काहीही तक्रार केली नव्हती. त्यांच्यासोबतचे मित्र 'हे आमदार आहेत' असे पोलिस निरीक्षक खोकले यांना सांगत होते. तरीही खोकले यांनी आमदारांना बराच वेळ थांबवून ठेवले होते. पण, आमदारांनी मात्र याबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती. 
लॉकडाउनच्या काळात खासगी बस बंद होत्या. या काळात बस सोडायला पन्नास हजार रुपये घेतल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यावर खोकले यांच्यावर पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 

लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी होती. तेव्हा वाहतूक करणाऱ्या नरसिंह श्रवनसिंह राजपुरोहित यांच्या खासगी बसवर सुखसागर पोलिसांनी कारवाई केली होती. ते प्रकरण तडजोडीसाठी खोकले यांनी मध्यस्थांमार्फत पन्नास हजार रुपये घेतल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्याची दखल घेत खोकले यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत पन्नास हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाल्यावर खोकले यांना पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी निलंबित केले आहे. 


नांदेड जिल्ह्यातील आणखी एका कॉंग्रेस आमदाराला कोरोना

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आणखी एका कॉंग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना पुढील उपाचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. हदगांवचे कॉंग्रेस आमदार माधव पाटील जळगावकर हे कोरोनाची लागण झालेले जिल्ह्यातील चौथे आमदार ठरले आहेत. यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, मोहन हंबर्डे, अमर राजूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. 

आमदार जळगांवकर यांना दोन दिवसांपूर्वी सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नांदेड येथील कोरोना आढावा बैठकीत जळगांवकर हे आमदार अमर राजूरकर यांच्या संपर्कात आले होते. तेव्हापासून ते होम क्वारंटाइन होते, शिवाय त्यावेळी केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल निगेटीव्ह देखील आला होता. 

परंतु दोन दिवासांपासून थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी नांदेडच्या खाजगी रुग्णालयात पुन्हा तपासणी करून घेतली आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जळगांवकर यांच्यावर यापुर्वी एक शस्त्रक्रिया झालेली असल्याने डॉक्टरांच्या सल्यानेच त्यांना पुढील उपचारासाठी विशेष ॲम्‍बुलन्‍सने मुंबईला पाठवण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com