नीलेश लंकेंनी दिले डॉ. अमोल कोल्हेंना नगर दक्षिणचे आमंत्रण 

कोल्हे हे अष्टपैलू खेळाडूसारखे आहेत. अष्टपैलू खेळाडूला कुठेही न्या, ते आपली चमक दाखविणारच.
Nilesh Lanke invited Amol Kolhe to contest Lok Sabha from Nagar Dakshin
Nilesh Lanke invited Amol Kolhe to contest Lok Sabha from Nagar Dakshin

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोक नशीबवान आहात, त्यांना डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखे अष्टपैलू खासदार लाभले. महाविकास आघाडी बनविण्यातही खासदार कोल्हे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आता पुढल्या वेळेस कोल्हे यांना आग्रह करून सांगावं की जरा आमच्याकडं या, आता दक्षिणेत जरा. कारण, कोल्हे हे अष्टपैलू खेळाडूसारखे आहेत. अष्टपैलू खेळाडूला कुठेही न्या, ते आपली चमक दाखविणारच, असे म्हणत पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना नगर दक्षिणमधून लोकसभा लढविण्याचे आमंत्रण देऊन टाकले. 

बेल्हे ते शिरूर या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे खासदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात लंके यांनी कोल्हे यांनी नगर दक्षिणची ऑफर दिली. सध्या या मतदारसंघाचे डॉ. सुजय विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी निवडणूक लढवली होती. 

लंके म्हणाले की, बेल्हे आणि शिरूर या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर अण्णा आणि माजी खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून झाले असली तरी त्याला निधी मिळवून देण्याचे काम खासदार कोल्हे यांनी केले आहे. आम्ही दोघे आधी एका तालमीत होतो. त्यामुळे आपल्या बोटाला धरून राष्ट्रवादीत आलेल्या नीलेश लंकेसुद्धा मदत झाली पाहिजे. म्हणून माझ्या मतदारसंघातील या रस्त्याच्या कामासाठी निधी दिला आहे. 

पारनेर मतदारसंघात जरी या महामार्गाची लांबी जास्त असली तरी दोन्ही तालुके जोडण्याचे काम कोल्हे यांनी केले आहे. वडनेर खुर्द आणि वडनेर बुद्रूक या पुलाचे कामे करून देण्याचे आश्‍वासन त्यांनीही मला दिले आहे. दिल्लीतून निधी खेचून आणायचा असेल, तर खासदारांच्या माध्यमातून आणावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी खासदार कोल्हे यांच्या कामाचे कौतुक केले. 

मी दिल्लीतून शरद पवार यांच्यासोबत विमानाने आलो, त्यालाही खासदार कोल्हे हेच कारणीभूत आहेत. आमची संरक्षण मंत्र्यासोबतची मिटिंग झाली. त्या वेळी शरद पवारांनी मला बरोबर येता का असे विचारले. खरं सांगायचं म्हणजे पवार साहेबांसोबत विमानाने येण्याचे तिकिट हे कोल्हे यांचे होते. पण, त्यांनी आपले तिकिट मला देऊन पवार साहेबांसोबत प्रवास करण्याची संधी दिली. असा किस्साही लंके यांनी या वेळी सांगितला. 

Edited By  : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com