आमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार?

माझ्या मतदार संघाची बांधणी एकदम फिट केलेली आहे.
MLA Nilesh Lanke to get promotion soon : Ramesh Thorat
MLA Nilesh Lanke to get promotion soon : Ramesh Thorat

केडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे; परंतु आमदारांकडून रूग्णांची अशी सेवा मी अद्याप पाहिलेली नाही. सामान्य माणूस त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रमोशन मिळू शकते, असे मत दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले. (MLA Nilesh Lanke to get promotion soon : Ramesh Thorat) 

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील राष्ट्रवादी डॅाक्टर सेलच्या अध्यक्षा डॅा वंदना मोहिते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उदघाटन प्रसंगी माजी आमदार थोरात बोलत होते. 

या वेळी आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, मीना धायगुडे, पोपटराव ताकवणे, भाऊसाहेब ढमढेरे, विशाल शेलार, संभाजी ताकवणे, पदमाकर देशमुख, संतोष शिलोत, अभय पितळे, दिनेश मोहिते आदी उपस्थित होते. शिबिरात ६५ जणांनी रक्तदान केले. सात रूग्णांवर मोफत अॅंजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.

आमदार नीलेश लंके म्हणाले, माजी आमदार रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या मतदार संघात एक लाखाच्यावर मताधिक्य घेता आले. माझ्या मतदार संघाची बांधणी एकदम फिट केलेली आहे. त्यामुळे पुढील विधानसभेच्या निवडणुकीत मी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यात येऊन प्रचार करणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना मतदान करणारे तुम्ही मतदार असल्याने तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला बारामतीजवळ आहे.

कोविड उपचारांबद्दल लंके म्हणाले, शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातून १८ हजार रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकही रूग्ण मयत झालेला नाही. कोरोनावरील भीती घालवणे, हेच औषध आहे. आणि आम्ही तेच करत रूग्णांना मानसिक आधार देतो. ‘मी तुला मरू देत नाही, काळजी करू नका, बिनधास्त राहा असे म्हटले की ५० टक्के आजार तिथेच कमी होतो. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हेच आमचे कामचे सूत्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com