माजी नगरसेविकेच्या पतीची आत्महत्या; चौघांवर गुन्हा

संशयित आरोपींनी पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन मानसिक त्रास दिल्यामुळे राजपूत यांनी २८ ऑक्‍टोबर रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये आत्महत्या केली होती.
Rajput.jpg
Rajput.jpg

पुणे : कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत यांचे पती जयंत राजपूत (Jayant Rajput) यांच्या आत्महत्येप्रकरणी डेक्कन पोलिसांनी शनिवारी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींनी पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन मानसिक त्रास दिल्यामुळे राजपूत यांनी २८ ऑक्‍टोबर रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये आत्महत्या केली होती. (Former corporator's husband commits suicide; Crime on all four)

राजेंद्र दत्तात्रय मारणे (वय ४५, रा. मोहननगर, धनकवडी), डॉ. विवेक रसिकराज वायसे (वय ४४, रा. बावधन), बापू सुंदर मोरे (वय ४०, रा. सिंहगड रोड), बापूराव विनायक पवार (वय ३४, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नीता जयंत राजपूत (वय ५५, रा. सदाशिव पेठ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा...

जयंत राजपूत यांनी २८ ऑक्‍टोबरला विधी महाविद्यालय रस्त्यावरील कांचनगंगा गल्लीच्या चैतन्य अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये संशयित आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता. नीता राजपूत यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मारणे हा टेम्पोचालक आहे. मोरे व पवार हे दोघे एका खासगी कंपनीच्या वसुली पथकात आहेत. पैशासाठी त्यांनी वेळोवेळी धमकी दिल्यामुळे राजपूत यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.

पैशासाठी आरोपींकडून दबाव

राजपूत यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘व्यवसायात आर्थिक तोटा झाला असून, आरोपींनी पैशासाठी दबाव आणल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत.’ असे नमूद केले होते. त्यानुसार राजपूत यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

हेही वाचा...

स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना लस 

अमरापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लसीकरणावर लोकांच्या उड्या पडल्या आहेत. सुरुवातीला 45 वयाच्या पुढील व्यक्तींना दिली जाणारी लस आता 18 ते 45 वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी करुन देण्यात येवू लागल्याने आरोग्य केंद्रावर गर्दी होवू लागली आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणीमुळे स्थानिकांऐवजी बाहेरच्यांनाच लस मिळू लागल्याने संताप व्यक्‍त होत आहे. 

शेवगाव तालुक्‍यातील कोरोना लसीकरणात सुसुत्रता यावी यासाठी शेवगाव व बोधेगाव येथील ग्रामिण रुग्णालयासह दहिगाव-ने, भातकुडगाव, ढोरजळगाव, हातगाव, घोटण या आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 45 वयापुढील व्यक्तींना व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना लस देताना प्रथम आलेल्यांना कुपण देवून लसीकरण करण्यात येत होते. यासाठीही नागरीक भल्या पहाटेपासून लसीकरण केंद्रावर रांगा करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाने गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी लस उपलब्ध झाल्यास त्यासाठी आँनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध केला. 

तालुक्‍यातील व्यक्तींना लस मिळण्याऐवजी बाहेरच्या जिह्यातील व तालुक्‍यातील व्यक्तींना नावनोंदणी मुळे लस द्यावी लागत आहे. या प्रकारामुळे लसीकरणासाठी नागरीकांचा इतरत्र सुरु झालेला प्रवास संसर्गासाठी बाधक ठरु शकतो. 
ऑनलाईन कोणी कोठुनही त्याचे बुकींग करु शकते. त्यामुळे जवळ असणाऱ्या इतर जिह्यातील व तालुक्‍यातील उपलब्ध असलेल्या केंद्राचा पर्याय नागरीक निवडत आहेत. तालुक्‍याच्या पूर्व भागातील जालना, बीड व औरंगाबाद येथील नागरीकांना तालुक्‍यातील अनेक केंद्रे सोयीचे वाटते. संपूर्ण राज्यस्तरावर नोंदणी सुरु असल्याने स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपाशिवाय लसीकरण करावे लागते. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com