सोशल मीडियाद्वारे महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल  - Filed a case against those who defamed great men through social media | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

सोशल मीडियाद्वारे महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

तेथे घाणेरडे व अश्‍लिल छायाचित्र, मजकूर वापरून त्यांची बदनामी केली जात होती. तसेच ब्राम्हण व ब्राम्हणेतर जातींमध्ये तेढ निर्माण करणारे मजकुर प्रसिद्ध केले आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj), राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी फेसबुक पेज, व्हॉटस्‌अप ग्रुपवर बदनामीकारक, आक्षेपार्ह व अश्‍लिल मजकुर, छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा प्रकार काही जणांनी केला होता. सायबर पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत 14 जणांसह आणखी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Filed a case against those who defamed great men through social media)

नाना पंडीत, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदिप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरुप भोसले यांच्यासह इतर समाजमाध्यम वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24, रा. कोथरुड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 4 मे 2021 या दिवशी व त्यापुर्वी "राजकारण महाराष्ट्राचे' हा फेसबुक ग्रुप, इंटिलेक्‍यच्युअल फोरम हा व्हॉटअस्‌अप ग्रुप, कोमट बॉईज ऍन्ड गर्ल्स फेसबुक ग्रुप, सीएम गेवेंद्र फडणवीस फॅन क्‍लब फेसबुक ग्रुप व ट्ठिवटर या समाजमाध्यमांवर अश्‍लिल व बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध करण्यात आला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्विटर अशा विविध ग्रुपवर विविध समाजघटकात शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अशा घटनात्मक पदांच्या व प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तीमत्वांच्या लौकीकास बाधा आणण्याकरीता त्यांचे छायाचित्र मॉर्फ करण्यात येत होते.

हेही वाचा...

नऊ मे पासून गाव बंद

तेथे घाणेरडे व अश्‍लिल छायाचित्र, मजकूर वापरून त्यांची बदनामी केली जात होती. तसेच ब्राम्हण व ब्राम्हणेतर जातींमध्ये तेढ निर्माण करणारे मजकुर प्रसिद्ध केले आहे. तसेच ट्ठिटरवर स्वरुप भोसले याने छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी देखील अश्‍लिल मजकूर लिहून तो प्रसिद्ध केला. या प्रकारामुळे राज्यातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डि.एस.हाके करीत आहेत. 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख