दिव्यांगांसाठी कोरोना लसीकरण केंद्र सुरु करणारी पिंपरी चिंचवड पहिली पालिका

पालिकेचा दिव्यांग कक्ष व पिंपरी रोटरी क्लब यांच्या सहकार्याने शहरातील ४५ वर्षावरील २१४५ पात्र दिव्यांगांसाठी रोटरी क्लब सभागृह, संभाजीनगर, चिंचवड येथे हे खास केंद्र सुरु होत आहे.
Pimpari chinchwad.jpg
Pimpari chinchwad.jpg

पिंपरी : शहरातील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतंत्र कोवीड- १९ लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय़ घेतला असून, उद्यापासूनच (ता.२८) ते सुरु होत आहे, असा उपक्रम राबविणारी राज्यातील ही पहिलीच पालिका ठरणार आहे.

पालिकेचा दिव्यांग कक्ष व पिंपरी रोटरी क्लब यांच्या सहकार्याने शहरातील ४५ वर्षावरील २१४५ पात्र दिव्यांगांसाठी  रोटरी क्लब सभागृह, संभाजीनगर, चिंचवड येथे हे खास केंद्र सुरु होत आहे. त्याचा सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, तेथे दिव्यांगांची काहीशी गैरसोय होत आहे. म्हणून त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असलेले हे विशेष केंद्र सुरु करण्यात आले आहे.पालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष मेहूल परमार यांचेसमवेत नियोजन करून ते सुरु केले आहे.

सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली असून तेथे पालिकेच्या आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॅा. सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत असणार आहे.
 

हेही वाचा...

दीड कोटी रुपयांचे आॅक्सिजन प्लाॅन्ट उभारणार

नगर : कोविड संकटाच्या काळात निर्माण झालेल्या आॅक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परिवाराच्या वतीने सुमारे दीड कोटी रूपये खर्च करून आॅक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

सर्वच रुग्णालया समोर सध्या आॅक्सिजनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय पातळीवरूनही आॅक्सिजन उपलब्ध होण्याच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेवून विळद घाटात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण आधुनिक परदेशी तंत्रज्ञान वापरून हा जिल्ह्य़ातील पहीलाच प्रकल्प ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

सद्यस्थितीत विळद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये १५० आॅक्सिजनचे बेड आहेत. नवीन आॅक्सिजन प्रकल्प उभारल्यानंतल ही बेडची संख्या ३०० करणार येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्य़ात अवघ्या दहा दिवसात कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पाचा मोठा दिलासा नागरिकांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com