रेमडीसिवीरच्या काळाबाजार केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक

या गुन्ह्यात शशिकांतचा डॉक्टर भाऊ सचिनचा सहभाग आढळल्याने आता त्यालाही अटक करण्यात आली. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
remdishivir.jpg
remdishivir.jpg

पिंपरी : रेमडीसिविर (Remdesivir) इंजेक्शनचा काळाबाजार करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि औषध दुकानदार पकडले गेल्यानंतर आता एका डॉक्टरलाच या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा बीएएमएस डॉक्टर दोन खासगी रुग्णालये चालवित होता. (Doctor arrested for blackmailing Remedicivir)

डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ, असे या डॉक्टरचे नाव आहे. तो आपला औषध दुकानदार सख्खा भाऊ व इतर दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो हा काळाबाजार करीत होता. तो चालवित असलेल्या दोन रुग्णालयांसाठीच्या रेम़डीसीवीरचा ही टोळी काळाबाजार करीत होती. त्यातील त्याचा भाऊ शशिकांत व त्याचे साथीदार कृष्णा पाटील (नर्सिंग स्टाफ), निखील नेहरकर (मेडिसीन डिलीव्हरी बॉय) यांना ९ तारखेला सरप्राईज नाकाबंदीत काळेवाडी फाटा येथे फौजदारअवधूत शिंगारे, पोलिस नाईक चौधरी, अतिश जाधव यांनी पकडले.त्यावेळी त्यांच्याकडे २१ रेमडीसिवीर मिळाली होती.काळ्याबाजारात  ती ते विकण्याच्या तयारीत होते.  त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यात शशिकांतचा डॉक्टर भाऊ सचिनचा सहभाग आढळल्याने आता त्यालाही अटक करण्यात आली. त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

तो चिंचवड येथील ओनेक्स,तर थेरगाव येथील क्रिस्टल ही दोन खासगी हॉस्पिटल चालवतो. त्याचा भाऊ शशिकांतचे ओनेक्समध्ये आय़ुश्री मेडिकल,तर स्वत डॉ. सचिनचे क्रिस्टलमध्ये गोदावरी मेडिकल हे औषधांचे दुकान आहे. या दोन्ही रुग्णालयाकरिता या दोन मेडिकलमध्ये आलेली २१ रेमडिसीवीर काळ्याबाजारात विकण्याच्या तयारीत असताना आरोपींना पकडण्यात आले आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा...

हेही वाचा...

वादळामुळे मोठे नुकसान

अकोले : वादळाने जंगलात राहणाऱ्या त्या अनाथांचा आधार डळमळीत केल्याची घटना आदिवासी भागातील अतिदुर्गम गाव असलेल्या कुमशेत येथे घडली. अर्धा तासात घरावरील व पडवी वरील छप्पर आकाशात नेत वादळाने होत्याचे नव्हते केले. 

कुमशेत बोरीची वाडी येथे बारकू दामू अस्वले, भाऊ दामू अस्वले, लालू दामू अस्वले,काळा बाई दामू अस्वले, ही चार भावंडे राहतात. १५ वर्षांपूर्वी आई वारली, तर वडील दोन वर्षांपूर्वी एका अपघातात दगावले. ही चार भावंडे अनाथ झाली, मात्र आपण शिक्षण घेऊन मोठे व्हायचे, ही जिद्द त्याच्या उराशी होती. त्याप्रमाणे ही चार मुले शिक्षण घेतानाच घरात असलेली चार गुरे सांभाळून मोलमजुरी करून आपले जीवन कंठीत आहेत.
रविवारी सायंकाळी दोन मुले जंगलात गुरे घेऊन गेली असताना अचानक पाऊसाचे वातावरण झाले, नि वादळ सुरु झाले. घरात काळाबाई स्वयंपाक करत होती. तर भाऊ अस्वले हा पाणी आणण्यासाठी गेला होता. अचानक मोठे वादळ आले नि घराचे व पड वीचे छपरे घेऊन वादळ निघून गेले. त्यातच पाऊस सुरु झाल्याने या गरीब अनाथ मुलांची चुल् विझली घरातील साहित्य, हंडे कपडे बाहेर फेकले गेल्याने काळाबाई व भाऊ धाय मोकलुन रडू लागले. त्याचवेळी गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली व मुलांना आधार दिला.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com