बिलाअभावी मृतदेह अडविला, कोरोना सेंटरवर गुन्हा नोंदविण्याचे अजित पवारांचे आदेश
Maratha meeitng.jpg

बिलाअभावी मृतदेह अडविला, कोरोना सेंटरवर गुन्हा नोंदविण्याचे अजित पवारांचे आदेश

पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ही बाब पवार यांच्या कानावर घालताच त्यांनी क्षणात कारवाईचा आदेश दिला.

पिंपरीः बिल न दिल्याने कोरोना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देणाऱ्या तळेगांव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील मायमर मेडिकल  कॉलेजवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिला. पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ही बाब पवार यांच्या कानावर घालताच त्यांनी क्षणात कारवाईचा आदेश दिला. (Ajit Pawar orders to register a case at Corona Center)

बारणे यांच्यामुळे हा संतापजनक प्रकार नुकताच (ता.३) उजेडात आला होता. त्यांनी कानउघाडणी केल्यानेच या मेडिकल कॉलेजने या रुग्णाचा मृतदेह त्याच्या मुलाच्या ताब्यात दिला. तोपर्यंत कॉलेजने तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. बील न दिल्याने तीन दिवस मृतदेह न देणे आणि नातेवाईकांची पिळवणूक करणे हे अतिशय संतापजनक आणि चुकीचे असल्याने सांगत मायमर  व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बारणे यांनी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत पवारांकडे करताच याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी दिले.

दरम्यान, या बैठकीपूर्वी काल महसूल विभागाचे अधिकारी काल मृत लोके यांचा मुलगा सुधीरकडे गेले. त्यांनी स्वतःच जबाब लिहिला आणि विलगीकरणात असतानाही या मुलाची सही घेतली. विलगीकरणातील व्यक्तीला भेटणे हा गुन्हा आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरी जाऊन महसूल विभागाचे अधिकारी स्वतःच्या हाताने जबाब लिहितात, हे अतिशय चुकीचे आहे.

गुन्हा करणाऱ्या संस्थेशी शासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यात गरीब भरडला जात आहे, असे बारणेंनी सांगत या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली. तीन दिवस एखादा मृतदेह अंत्यविधी न करता ठेवता येतो का, असे त्यांनी बैठकीत विचारताच प्रशासनाने तो तसा ठेवता येत नसल्याचे स्पष्ट केले. काही कारणाने तो ठेवायचा असेल, तर ज्या दिवशी मृत्यू झाला आहे, त्याच दिवशी त्याची खबर दिली पाहिजे, असे प्रशासनाने सांगितले. त्यावर मायमर कॉलेजच्या कोरोना सेंटरमध्ये लोणावळ्याजवळील मळवलीतील गणेश लोके या रुग्णाचा १ मे रोजी मृत्यू झाला. त्याच्या कुटूंबियांकडे बिल  देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तीन दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला होता.

हेही वाचा...

मायमरच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे या माझ्यासमोर मृताच्या मुलाशी अरेरावी करत होत्या.उद्धटपणे बोलत होत्या. त्या मुलाने महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी अर्ज केला होता. त्याला 50 हजार रुपये मंजूर होणार होते.बिल,पण तेवढेच होते.असे असतानाही मृतदेह देण्यास नकार दिला होता, अशी सर्व हकीकत खासदार बारणे यांनी सांगितली.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in