रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनसाठी भाजप पदाधिकार्याचा मुंबईत ठिय्या

नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी ४०० ते ५०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे.
remdishivir.jpg
remdishivir.jpg

नाशिक : पंधरा दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता शहर व जिल्ह्यात जाणवतं असताना देखील नाशिककडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (ता.२९) मुंबईतील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात धडक देत तीन तास ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनाचा ज्वर चढतं असल्याने अखेरीस एफडीएच्या प्रमुखांनी जिल्हाधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सुचना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मार्च महिन्यापासून शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बेहाल करून सोडले आहे. प्रारंभी बेड मिळतं नव्हते. बेड मिळाले तर ऑक्सिजन नाही.

ऑक्सिजन बेड मिळाला तर रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळतं नसल्याने संपुर्ण शहरचं व्हेन्टीलेटरवर आले आहे, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी नाशिक शहर दौरा करून परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुशंगाने गुरुवारी (ता. २९) बीकेसी मधील अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपच्या पदाधिकार्यांनी धडक दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले,  शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, भाजप संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव आदींनी एफडीएचे सचिव विजय सौरभ यांच्याशी चर्चा केली.

नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी ४०० ते ५०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. वास्तविक राज्यात पुणे व ठाणेपेक्षा अधिक रुग्ण आढळतं असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा अधिक पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र तो होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. नाशिक जिल्ह्यासाठी १२५ टन ऑक्सीजनची गरज असतांना फक्त सरासरी ७० टन ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. बघू, करू असे सरकारी छाप उत्तर मिळतं असल्याने ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. 

आंदोलनाचे फलित  

आंदोलन सुरु असतानाचं एफडीएचे आयुक्त परिमल सिंग,  उपायुक्त विजय वाघमारे यांनी तातडीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. बैठकीत नाशिक मधील रुग्णांसाठी वाढीव रेमडेसिव्हिर व ऑक्सीजन उपलब्ध करून घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नाशिकसाठी १०० टन ऑक्सीजन व सुमारे २ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com