सतेज पाटलांनी दोन संचालक फोडले आणि तेथेच महाडिकांचे वासे फिरले

`गोकुळ’ च्या सत्तारूढ गटाविरोधात पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन वर्षापासूनच तयारी सुरू केली होती, त्यात त्यांचे सुमारे ६०० शिलेदार राबत होते.
Satej Patil.jpg
Satej Patil.jpg

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील (गोकुळ) (Gokul) सत्ताधाऱ्यांना हरवण्यासाठी तीन मंत्री, दोन खासदार, सहा आमदार, दोन माजी आमदार अशी तब्बल ११ दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली होती, त्यांच्या जोडीला विश्‍वास पाटील (Vishvas Patil) व अरूण डोंगळे यांच्यासारखे ताकदीचे दोन विद्यमान संचालक होते. सत्ताधाऱ्यांकडे मात्र दोन आमदार, चार माजी आमदार, दोन माजी खासदार व ज्येष्ठ संचालक अरूण नरके अशी आठ जणांची ताकद होती. (Satej Patil fired two directors and that's where Mahadik's vassals went)

`गोकुळ’ च्या सत्तारूढ गटाविरोधात पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन वर्षापासूनच तयारी सुरू केली होती, त्यात त्यांचे सुमारे ६०० शिलेदार राबत होते. अतिशय सुक्ष्म नियोजन करताना ठरावदारांना संपर्क करणे, त्यांच्याशी ‘वाटाघाटी’ करणे आणि शेवटच्या क्षणापर्यत संबंधितांचे मतदान आपल्याच आघाडीला होईल, यासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच त्यांचा विजय सुकर झाला. त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील व अरूण डोंगळे यांच्या बंडखोरीचा फायदा उठवताना त्यांनाही आपल्यासोबत घेतले.

एकदा रणनिती निश्‍चित झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे म्हणून जेवढे आजी माजी आमदार खासदार होते त्यांचीही मोट बांधण्यात ते यशस्वी झाले.

पाटील-डोंगळे यांनी सर्व फायदे घेतल्याने त्यांच्या विरोधातील नाराजी मतपेटीत उमटेल, अशी एक शक्यता सत्ताधारी नेत्यांना होती, पण ती फोल ठरवतानाच या दोघांनी अन्य दोन संचालकांनाही सोबत घेत सत्ताधाऱ्यांची काही मतेही आपल्या बाजून वळवली.

हेही वाचा...

विरोधकांची ही रणनितीच सत्ताधारी नेत्यांना शेवटपर्यंत कळली नाही. नेत्यांची मुले उमेदवार असल्याने त्यांच्या विरोधात मतदान होईल आणि आपल्याला सहानुभुमी मिळेल या आशेवरच सत्ताधारी गाफील राहीले, पण मतदानात तसे काही दिसले नाही. त्यामुळेच त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

सत्तारूढ गटाचे नेते

आमदार पी. एन. पाटील
आमदार प्रकाश आवाडे
माजी आमदार महादेवराव महाडीक
माजी आमदार संजय घाटगे
माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर
माजी आमदार अमल महाडीक
माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार धनंजय महाडीक
ज्येष्ठ संचालक अरूण नरके

विरोधी आघाडीचे नेते

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री सतेज पाटील
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
खासदार प्रा. संजय मंडलिक
खासदार धैर्यशील माने
आमदार विनय कोरे
आमदार राजेश पाटील
आमदार प्रकाश आबिटकर
आमदार क्रुतुराज पाटील
आमदार राजू आवळे
आमदार जयंत आसंगावकर
माजी आमदार चंद्रदीप नरके
माजी आमदार के. पी. पाटील
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर
विद्यमान संचालक विश्‍वास पाटील
विद्यमान संचालक अरूण डोंगळे
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील
तीन मंत्री, दोन खासदार, सहा आमदार, तीन माजी आमदार

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com