सोलापूरमध्ये आदेश, घरामध्ये जितके टॉयलेट तितक्याच लोकांना होता येईल होमक्वारंटाईन

सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेकडून कडक पावलेउचलण्यात येत आहेत.
solapur.jpg
solapur.jpg

सोलापूर : झोपडपट्टीमधील नागरिकांना होम क्वारंटाईन ठेवता येणार नाही. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हायचं नसेल, तर हॉटेल क्वारंटाईन व्हा. घरात जेवढे टाॅयलेट आहेत, तितक्चया लोकांना घरामध्ये क्वारंटाई होता येईल, असे आदेश सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत.

सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान शहरातील नागरिक  इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनसाठी पुढे येत नाहीत, हे आढळून आले आहे. त्यामुळे  शासनाच्या नियमाप्रमाणे नागरीकांना ज्या घरामध्ये जितके टॉयलेट आहेत, तितक्याच लोकांना घरामध्ये राहता येणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त लोकांना रहाता येणार नाही. उरलेल्या लोकांना इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनसाठी जाणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांना होम कॉरंटाईनमध्ये रहायचे इच्छा असेल, तर महाकवच ऍ़प डाऊनलोड करुन त्यामध्ये ट्रॅकिंगसाठी ठेवणे बंधनकारक आहे. जर या तीन अटीवर संबंधितांना मान्य असतील, तर अशा नागरिकांना होम कॉरंटाईन होता येणार आहे.
बाकी सर्व लोकांना इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनसाठी सक्ती करण्यात आली आहे. तर झोपडपड्डीमधील नागरिकांना होम कॉरंटाईन ठेवता येणार नाही. जर नागरिकांना इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनची जाण्याची इच्छा नसेल, तर त्यांच्यासाठी  हॉटेल कॉरंटाईनचा पर्याय उपलब्ध आहे. महापालिकेने यासाठी 11 हॉटेलची तशी यादी ही जाहीर केली आहे, असे शिवशंकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...

कोरोनाच्या नव्या 2210 रुग्णांची वाढ 

नगर : कोरोना रुग्णवाढीचा आलेख कायम आहे. रोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. यामुळे अनेक रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. शनिवारी (ता. 10) दिवसभरात नवे 2210 रुग्ण वाढले. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 960, खासगी प्रयोगशाळेत 484, रॅपिड अँटिजेन चाचणीत 766 रुग्ण आढळून आले. शहरातील सर्वाधिक रुग्णांची संख्या कायम आहे. शहरात 534 रुग्ण आढळून आले. उपचार सुरू असलेल्यांची संख्या 12 हजार 61 झाली आहे. 

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः राहाता 183, संगमनेर 163, श्रीरामपूर 162, कर्जत 150, राहुरी 140, नगर 115, अकोले 111, शेवगाव 107, पारनेर 105, कोपरगाव 87, जामखेड 81, पाथर्डी 60, श्रीगोंदे 51, भिंगार उपनगर 50, लष्करी रुग्णालय 14, तर अन्य जिल्ह्यांतील 10 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या एक लाख 13 हजार 633 झाली आहे. आतापर्यंत एक हजार 282 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98वरून 88 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आले आहे. दिवसभरात एक हजार 996 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक लाख 290 रुग्ण बरे झाले आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com