जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार  : थोरात  - Will decide President of Nagar District Bank by Conscientious Say Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार  : थोरात 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत, तीन जागा आल्या मात्र दुर्दैवाने एका जागेचा अपेक्षित निकाल आला नाही. मात्र बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर आज त्यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला.

संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली. चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत, तीन जागा आल्या मात्र दुर्दैवाने एका जागेचा अपेक्षित निकाल आला नाही. मात्र बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर आज त्यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ''अहमदनगर जिल्हा सहकारी बँक राज्यातील अग्रगण्य बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रुपाने मदत होत असते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे. शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरलेल्या या महत्वाच्या बँकेची निवडणूक राजकारण विरहित केली आहे. साखर कारखानदारी सर्वांकडे आहे, ती चांगल्या पद्धतीने चालली तर आर्थिक चलन चांगले फिरते. जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पध्दत आहे. ही शिस्त आमच्याकडे असलेली शिस्त आम्हाला कायम टिकवायची आहे. त्यात राजकरणाचा गुंता आम्ही करीत नाही.''

आवश्यकतेप्रमाणे गरजूला कर्जवाटप करणे, कारखाना चांगला चालविणे व त्यातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे जुने सूत्र असून, तेच आम्ही टिकवतो आहे असेही थोरात म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख