अनुदानाच्या श्रेयासाठी राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच - Tussle Between BJP Sena and NCP over Grant | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

अनुदानाच्या श्रेयासाठी राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

तालुक्यात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झालेल्या सरकाराच्या मिळणा-या चौदा कोटी रुपयाचे अनुदानाचे श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी , भारतीय जनता पक्षात व शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे

पाथर्डी :  तालुक्यात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झालेल्या सरकाराच्या मिळणा-या चौदा कोटी रुपयाचे अनुदानाचे श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी , भारतीय जनता पक्षात व शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. भाजपाच्या एका गटाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना पाहणी दौ-यात अडविले आता अनुदानाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, अशी टिका अॅड. प्रताप ढाकणेंनी केली आहे. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी शेतक-यांना मिळणारे अनुदान शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने मिळाले असल्याची माहीती दिली. तालुक्यातील शेतक-यांना चौदा कोटी रुपयाच्या अनुदानाची रक्कम मिळाली आहे. तिचे वाटप मंगळवार पासुन शेतक-यांच्या खात्यावर होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारेश्वरचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी हसन मुश्रीफ यांना शेतक-यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केली होती. मुश्रीफ यांनी पाथर्डी व शेवगावचा दौरा केला होता. शेतक-यांची दिवाळी गोड करु असे मुश्रीफ यांनी त्यावेळी सांगितले होते. 

सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये व फळपिंकासाठी पंचवीस हजार रुपयाची मदत जाहीर केली. त्याचे अनुदानाचे पैसे आले आहेत. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे व चंद्रशेखर घुले यांनी पत्रक प्रसिद्धीला देवुन ही मदत राज्याचे महाआघाडीचे सरकार करणार असून भारतीय जनता पक्षाने याचे श्रेय लाटु नये, अशी टिका केली. शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश चितळे यांनी शेतक-यांना मिळाणारी मदत ही उद्धव ठाकरे सरकारने केली आहे, असे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. महाआघाडीचे आम्ही सैनिकही घटक अहोत. पालकमंत्र्यांच्या दौ-यात आम्हीही सहभागी झालो होतो असे चितळे यांनी सांगितले. 

पालकमंत्र्याच्या दौ-याच्या एक दिवस अगोदरच भारतीय जनता पक्षाच्या आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी-शेवगाव तालुक्याचा दौरा करुन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यामुळे आता शेतक-यांना मिळणारे अनुदान कोणामुळे मिळाले असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजळे यांनीही पालकमंत्र्यांना लेखी पत्र देवुन पिकांच्या नुकसान झाल्याने अनुदान मिळावे अशी मागमी केली होती. शिवसेना, राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाच्या कलगीतु-यामधे काँग्रेस पक्ष मात्र शांत असल्याचे दिसते आहे. श्रेय कोणालाही मिळो शेतक-यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम लवकर जमा व्हावी असा आग्रह शेतक-यांनी धरला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख