शिर्डी देवसंस्थान राष्ट्रवादीकडे; अध्यक्षपदी आमदार काळेंची नियुक्ती निश्चित, पंढरपूर काँग्रेसच्या पारड्यात

त्यांच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Shirdi Dev Sansthan to NCP; Congress will get Vitthal-Rukmini Dev Sansthan of Pandharpur :
Shirdi Dev Sansthan to NCP; Congress will get Vitthal-Rukmini Dev Sansthan of Pandharpur :

मुंबई : गेली काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महामंडळ वाटपाच्या मुद्यावर आज (ता. २२ जून) महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत विचारविनिमय झाला. त्यातील माहितीनुसार शिर्डीचे साईबाबा देवसंस्थान हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी देवसंस्थान हे काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे. मुंबईचे सिद्धीविनायक देवसंस्थान हे सध्या शिवसेनेकडे असून नव्या सूत्रातही ते सेनेकडेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Shirdi Dev Sansthan to NCP; Congress will get Vitthal-Rukmini Dev Sansthan of Pandharpur)

दरम्यान, शिर्डीच्या साईबाबा देवसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

राज्यातील महामंडळ वाटपाबाबात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज बैठक झाली. त्यात महामंडळ वाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगण्यात येते. राज्यातील सर्वांत श्रीमंत देवसंस्थान मानले जात असलेले नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा देवसंस्थान राष्ट्रवादीकडे, तर पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी देवसंस्थान हे काँग्रेसला मिळाल्याचे सांगण्यात येते. वस्तुतः या दोन्ही देवसंस्थांनावर दोन्ही काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्येकी एक देवसंस्थान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे.

दरम्यान, शिर्डीचे श्रीमंत देवसंस्थान आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्याच ताब्यात होते. काँग्रेस आघाडीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातही ह्या देवसंस्थानवर काँग्रेसचाच ताबा होता. पण, महाविकास आघाडीच्या काळात प्रथमच हे देवसंस्थान राष्ट्रवादीकडे आले आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून अध्यक्षपदावर आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागल्यात जमा आहे.

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान मात्र काँग्रेसच्या पारड्यात गेले आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून कोणाला संधी दिली जाते, ह्याची उत्सुकता आहे. मुंबईतील सिद्धीविनायक सध्या शिवसेनेकडे आहे. भाजप सरकारच्या काळातही ते शिवसेनेकडेच होते. त्यामुळे नव्या सरकारमध्येही ते शिवसेनेकडून राहण्याची शक्यता असून त्यांच्या अध्यक्षपदी सध्या आदेश बांदेकर कार्यरत आहेत.

महामंडळांच्या नियुक्त्या येत्या १५ दिवसांत जाहीर होणार आहेत. मात्र, त्या नियुक्या करताना महाविकास आघाडीत काहींसा विसंवाद दिसून आला. कारण काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महामंडळाचे वाटप हे समसमान पद्धतीने होणार असल्याचे सांगितले आहे, तर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आमदारांच्या संख्येनुसार संबंधित पक्षाला महामंडळे मिळणार असल्याचे सांगितले. तसेच, अपक्षांच्या वाट्यालाही काही महामंडळे येणार आहेत. पटोले आणि शिंदे यांच्या विसंगत माहितीमुळे महामंडळे कोणाच्या वाट्याला किती येणार आहेत, याबाबतचा संभ्रम वाढला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com