खंडणीसाठी मुलाचे अपहरण : असा लावला पोलिसांनी छडा - Police release abducted children | Politics Marathi News - Sarkarnama

खंडणीसाठी मुलाचे अपहरण : असा लावला पोलिसांनी छडा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

अमरावतीमधून अपहरण झालेल्या चार वर्षांच्या मुलाची नगरमध्ये सुखरूप सुटका करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

नगर : अमरावतीमधून अपहरण झालेल्या चार वर्षांच्या मुलाची नगरमध्ये सुखरूप सुटका करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. पोलिसांनी आतापर्यंत एका महिलेसह पाच आरोपींना अटक केली. मुलाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा आरोपींचा कट होता. मात्र,अमरावती आणि नगरच्या पोलिसांनी तातडीने हालचाली करत तो कट उधळून लावला.

या घटने संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नयन मुकेश लुणिया (वय ४, रा. अमरावती) याचे १७ फेब्रुवारीला अपहरण झाले होते. अमरावती पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अधारे आरोपी नगरला आल्याची माहिती मिळाली होती.

नगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू करुन, त्यांनी काही वेळातच हिना शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे, अल्मश ताहेर शेख, असिफ हिमायत शेख, मुजाही नासीर शेख व फैरोज नसीर शेख (रा. नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नयनची सुखरूप सुटका करण्यात आली. यातील आणखी एका महिलेसह चार आरोपी फरार आहेत.

पुण्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी 

पोलिसांना प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, यातील हिना शेख उर्फ हिना देशपांडे या महिलेने पैशांसाठी हे अपहरण घडवून आणले. आरोपी हिना हिचे अमरावतीला लुणिया यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीची तिला माहिती होती. कर्ज चुकते करण्यासाठी तिला पैशांची गरज होती. पैसे मिळविण्यासाठी अन्य आरोपींच्या मदतीने नयनच्या अपहरणाची योजना तयार करण्यात आली. १७ तारखेला नयन याला घरातून बाहेर आणून दुचाकीवरून काही अंतर नेले. त्यानंतर त्याला नगरला आणण्यात आले. 

नंतर त्याला कल्याण येथे घेऊ जाऊन तेथून लुणिया यांच्याकडे खंडणी मागण्याची आरोपींची योजना होती. मात्र, अमरावती पोलिसांनी तक्रार येताच तापस सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नगर येथील पोलिसांशी संपर्क साधला. नगर पोलिसांनीही गतीने हाचाली केल्याने अशा गुन्ह्यांत सराईत असलेले आरोपी पोलिसांच्या हाती लागले आणि नयनची सुटका झाली.

अंडरवर्ल्ड डॅान रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात...
 

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी ट्विटकरत अमरावती आणि नगरच्या पोलिसांचे कौतृक केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, अमरावती पोलिसांनी नयन लुनिया या अपहृत बालकाचा ४० तासांत शोध घेऊन अहमदनगर येथून त्याची मुक्तता केली.अपहरणकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली. अमरावतीचे पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्प वेळेत केलेला हा तपास अभिनंदनीय आहे. मला या सर्वांच्या कार्याचा अभिमान वाटतो. असे ते म्हणाले आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख