पालिका निवडणूक लढवलेल्या मनसे नेत्यासह कुटुंबीयांची नावे मतदार यादीतून गायब  - MNS leader Amol Palve and his family members name dropped from the voter list | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

पालिका निवडणूक लढवलेल्या मनसे नेत्यासह कुटुंबीयांची नावे मतदार यादीतून गायब 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 4 मार्च 2021

काही राजकीय मंडळींच्या सल्ल्यानुसार  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रारूप मतदार यादीतून आमची नावे गायब केली आहेत.

शेवगाव (जि. नगर) : शेवगाव नगर पालिकेची मागील पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर लढविलेले मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अमोल पालवे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नगरपालिकेच्या मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे मतदार यादीतील गोंधळाचा अजब नमुना शेवगावमध्ये पाहावयास मिळाला आहे. 

शेवगाव नगरपालिकेच्या प्रभाग 14 मधून मागील निवडणूक लढविलेले अमोल पालवे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांची नावे नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीतून गायब झाले आहेत, त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्कच डावलला गेला आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबांतील वगळण्यात आलेली ही नावे पुन्हा अंतिम यादीत समाविष्ट करावीत; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा अमोल पालवे यांनी दिला आहे. 

तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांना याबाबत अमोल पालवे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे,"मी शेवगाव शहरातील खंडोबानगर भागात कुटुंबासह वास्तव्यास आहे. नगर परिषदेची 2015-16 मध्ये पहिली पंचवार्षिक निवडणूक प्रभाग 14 मधून मनसेच्या अधिकृत तिकिटावर लढविली होती. त्यामुळे अडचणीत आलेल्या काही राजकीय मंडळींच्या सल्ल्यानुसार नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व प्रारूप मतदार यादीतून माझ्यासह माझे वडील महादेव, आई मंगल व बहीण शीतल यांची नावे गायब करण्यात आली आहेत. याबाबत मुदतीच्या वेळेत हरकतही घेण्यात आली आहे.'' 

"नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येणाऱ्या अंतिम यादीत आमची नावे समाविष्ट न झाल्यास कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्यात येईल,'' असा इशारा पालवे यांनी दिला आहे. 

हेही वाचा : योगेश बहल म्हणाले, "मी तुझा कार्यक्रम करेन' 

पिंपरी : सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणाला "मी तुझा कार्यक्रम करेन,' अशी धमकी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी फोनवरून दिली. त्याचा ऑडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. 

दरम्यान, या धमकीनंतर दोन-तीन दिवसांतच या तरुणाच्या बाईकचा अपघात झाला. तो बहल यांनीच घडवून आणल्याचा आरोप त्याने केला आहे. हे आरोप मात्र योगेश बहल यांनी फेटाळून लावले आहेत. 

श्‍याम घोडके असे या तरुणाचे नाव असून त्याचा क्षितिजा टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय आहे. स्थानिक पोलिस चौकी वा पोलिस ठाणे मॅनेज होण्याच्या शक्‍यतेतून त्याने थेट पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. मर्यादेत राहिला, तर बरं होईल, नाही तर बायांच्या नादाला लागून तुझा कार्यक्रम होईल, मीच करेन, अशी धमकी माजी महापौर बहल यांनी दिल्याचे घोडके याने सांगितले. यामुळे आपल्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास त्याला बहलच जबाबदार असतील, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख