उत्तर प्रदेशात लॉकडाउन वाढवला - Increased lockdown in Uttar Pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

उत्तर प्रदेशात लॉकडाउन वाढवला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 मे 2021

उत्तर प्रदेश सरकारने राज्यव्यापी लॉकडाउनची मुदत १७ मेपर्यंत वाढविली आहे. सध्या लागू असलेल्या लॉकडाउनचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने संसर्गवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाउन आवश्‍यक असल्याचे राज्य सरकारने सांगितले.

लखनौ : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने राज्यव्यापी लॉकडाउनची मुदत १७ मेपर्यंत वाढविली आहे. सध्या लागू असलेल्या लॉकडाउनचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने संसर्गवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाउन आवश्‍यक असल्याचे राज्य सरकारने सांगितले. (Increased lockdown in Uttar Pradesh)

आधीच्या नियोजनानुसार उद्या (ता. १०) सकाळी लॉकडाउनची मुदत संपणार होती. आता, १७ तारखेला सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्‍यक आणि काही निवडक सेवा वगळता राज्यातील सर्व व्यवहार बंद असतील. ‘लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम दिसून हेत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास याचा फायदा होत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आणखी फायदा होण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे,’ असे राज्य सरकारने लागू केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या कालावधीत बहुतांशी व्यवहार बंद राहणार असले तरी अत्यावश्‍यक सेवा, लसीकरण आणि औद्योगिक कामकाज सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २० मेपर्यंत सुटी जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात ऑनलाइन वर्गही बंद असतील.

काश्‍मीरमध्येही संचारबंदीत वाढ

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्व २० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी आणखी सात दिवस वाढविण्यात आली आहे. यामुळे या केंद्रशासित प्रदेशात आता १७ मे ला सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. विवाह कार्यक्रमांवरही निर्बंध लागू करण्यात आले असून याप्रसंगी केवळ २५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 

हेही वाचा..

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिलासा 

नगर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणारे रुग्ण संख्या जास्त झाली आहे. रविवारी (ता.9) दिवसभरात 3799 रुग्ण बरे झाले आहेत. 3327 नवीन बाधित आढळून आले आहेत. 

जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 25 हजार 928 झाली आहे. त्याच बरोबर 19 रुग्णांना आपली जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 2301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1220, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 1416, रॅपिड अँटीजेन चाचणीत 692 आढळून आले. दिवसभरात एकूण 3328 बाधित आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख नऊ हजार 314 झाली आहे. आतापर्यंत एक लाख 81 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.51 टक्के झाले आहे. 

हेही वाचा..

कृषी शिक्षणासाठी नवीन धोरण

तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी 
 

नगर शहर 421, नगर तालुका 342, शेवगाव 327, राहाता 296, जामखेड 275, नेवासा 213, पारनेर 196, संगमनेर 190, पाथर्डी 175, राहुरी 173, श्रीगोंदा व श्रीरामपूर प्रत्येकी 167, कोपरगाव 128, कर्जत 109, अकोले 53 रुग्ण आढळून आले आहेत. भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत 26 रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील 66 तर परराज्यातील 4 रुग्ण आढळून आले आहेत. 
 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख