नड्डांचा हल्लाबोल : राहुल गांधींचे हीन राजकारण आणि दुतोंडीपणा नोंदवला जाईल - BJP president J. P Nadda targets Rahul Gandhi and congress for double standards | Politics Marathi News - Sarkarnama

नड्डांचा हल्लाबोल : राहुल गांधींचे हीन राजकारण आणि दुतोंडीपणा नोंदवला जाईल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

कोरोनासारख्या भीषण महासाथीशी भारताची लढाई सुरू असताना राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचा व्यवहार हा अत्यंत हीन राजकारण आणि दुतोंडीपणाचा होता, हे नोंदवले जाईल.

नवी दिल्ली : कोरोनासारख्या भीषण महासाथीशी भारताची लढाई सुरू असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस नेत्यांचा व्यवहार हा अत्यंत हीन राजकारण आणि दुतोंडीपणाचा होता, हे नोंदवले जाईल, असा प्रतिहल्ला भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा (J.P.Nadda) यांनी केला आहे. (BJP president J. P Nadda targets Rahul Gandhi and congress for double standards)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नड्डा यांनी काँग्रेस कार्यसमितील ठरावाचा आणि भाषणांचा निषेध केला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी हे कोरोना व्यवस्थापनावरून दररोज सरकारवर कोरडे ओढत असल्याचाही राग नड्डा यांनी उघडपणे बोलून दाखवला आहे. दुसरी लाट ही मोदी सरकारची उदासीनता, असंवेदनशीलता आणि अक्षमता यांचा थेट परिणाम असल्याचे टीकास्त्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीत सोडले होते. त्यामुळे आणि त्यानंतरच्या ठरावामुळे चिडलेल्या भाजपच्या नेतृत्वाने नड्डा यांच्याकरवी पत्र लिहून घेत काँग्रेसवर घणाघाती हल्ला केल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात काँग्रेस जे वर्तन करत आहे त्यामुळे चकित झालो नसलो तरी दुःखी झालो आहे, असे म्हणून नड्डा यांनी पत्रात म्हटले आहे. राहुल गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये आणि व्यवहार हा दुतोंडीपणा आहे. लसीकरणाबाबत काँग्रेस जनतेत संभ्रम आणि गैरसमज पसरविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, असे सांगतानाच नड्डा यांनी पत्रात म्हटले आहे, की अलीकडच्या काळात भारतात लसीबाबत गैरसमज पसरवला गेला नव्हता. मात्र काँग्रेस या भीषण आपत्तीकाळातही तसा प्रयत्न करत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे.

संपूर्ण देश महासाथीशी लढत असताना काँग्रेसने लोकांत दहशत पसरवणे आणि लोकांना भ्रमित करणे तत्काळ थांबवले पाहिजे, असे नड्डा म्हणाले.
 

हेही वाचा..

रिक्षा चालकांचे कर माफ करा 

नगर : जिल्ह्यातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालक-मालक यांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा ऍटो रिक्षा व टॅक्‍सी चालक मालक संघटनेतर्फे उपाध्यक्ष दत्ता वामन यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षभरापासून कोरोनामुळे ऍटोरिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आलेला आहे. रिक्षा चालक कोरोना रुग्ण व नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये ने-आण करण्याचे काम करत आहेत. यात 15 ते 20 जणांनाचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. कोरोनामुळे बळी पडलेल्या रिक्षा चालकांच्या कुटूंबियांनी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. 

हेही वाचा...

राहुल जगतापांनी फुंकले रणसिंग

गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांचा व्यवसायच बंद असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीचा विचार करुन सरकारने सर्वप्रकारचे कर माफ करावेत, रिक्षा चालकांना किमान 10 हजारांची आर्थिक मदत द्यावी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना 10 लाखांची मदत द्यावी, या मागणींचा सहानभुतीपूर्वक विचार करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन यांनी दिला आहे. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख