त्यांची चावी फिरवली तेवढेच ते बोलतात ! दानवेंचा संजय राऊत यांना टोला - They talk as much as they turn the key! Tola to Sanjay Raut of Danve | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

त्यांची चावी फिरवली तेवढेच ते बोलतात ! दानवेंचा संजय राऊत यांना टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जून 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर काल ईडीकडून छापे टाकण्यात आले. यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नसून राज्य सरकार त्यांचं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

जालना : ओबीसींना (OBC) राजकीय आरक्षण मिळावे म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील वडेट्टीवार, भुजबळ (Bhujbal) हे मंत्री मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे हेच सरकार ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच राऊत यांची चावी फिरविली की तेवढेच बोलतात, नंतर भलतेच बोलतात, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेेचे नेते संजय राऊत यांच्यावर केली. (They talk as much as they turn the key! Tola to Sanjay Raut of Danve)

जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर काल ईडीकडून छापे टाकण्यात आले. यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नसून राज्य सरकार त्यांचं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

राज्य सरकार राज्यात नवे निर्बंध लावत असून राज्य सरकारने शाळा, रोजगार, देवस्थानाबाबत राज्यात सरसकट निर्बंध लादू नये, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या 4 जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या रद्द कराव्यात, अशी आमची मागणी आहे, मात्र निवडणुका रद्द न झाल्यास त्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी ओबीसींचे उमेदवार होते, तिथे ओबीसींचेच उमेदवार भाजप देणार असल्याच दानवे यांनी म्हटले आहे.

आमच्यामागे तपास संस्था लावल्या गेल्या आहेत. आम्ही बघून घेऊ, असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर दिला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत हे जे बोलतात ते कुणाच्यातरी सांगण्यावरून बोलतात, त्यांची चाबी फिरवली जाते, असा टोला दानवे यांनी हानला आहे.

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून, ओबीसीं आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसही आंदोलन करतात, यावर बोलताना दानवे यांनी अमर, अकबर, अँथनीच्या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याची टीका केली.
 

हेही वाचा..

देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच थोरात भडकले

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख