फडणवीस खडसेंच्या घरी जाताच, खडसे शरद पवारांच्या भेटीला

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर त्यांच्याशी राजकीय वाद असलेले माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
Pawar and khadse.jpg
Pawar and khadse.jpg

जळगाव : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर त्यांच्याशी राजकीय वाद असलेले माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. (As soon as Fadnavis went to Khadse's house, Khadse met Sharad Pawar)

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राजकीय विरोध आता सर्वानाच माहीत आहे.या वादामुळे आपल्याला भाजपमध्ये अनेक त्रास झाला असे खडसे यानी वेळोवेळी सांगितले त्यानंतर त्यांनी जाहीरपणे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.त्या नंतर त्यांनी आपण पक्षावर नव्हे तर फडणवीस यांच्यावर असल्याचे सांगत जाहीरपणे टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यात खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे काल नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, या वेळी त्यांनी खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. 

या नंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंबई येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली, त्यांच्या समवेत राज्याचे उच्च  व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत होते. खडसे आणि पवार यांच्यात काय चर्चा झाली याची आता चर्चा सुरू आहे.
 

हेही वाचा...

भिंगारची कोरोनामुक्तीकडे होणारी वाटचाल

नगर : कोविडच्या काळात अनेकांनी आपापल्यापरीने या संकटाविरोधात लढा उभारला. या काळात सर्वस्तरातून मदत कार्य केले गेले. मी खासदार या नात्याने पहिल्या लाटे केलेल्या कामा प्रमणे दुसऱ्या लाटेतही बरचं काही करणार होतो. पण मी रेमडेसिव्हिर इंजक्शन उपलब्ध केल्यानंतर जे काही घडले. त्यामुळे माझे मन खालावले व मला थांबावे लागले, असे मत खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारने योग्य काळजी घेतली नसल्याने मला पुढेचे मदत कार्य थांबवावे लागले. त्यामुळे या लाटेत खासदार या नात्याने म्हणवे तसं योगदान देवू शकलो नाही. पण या संकटात वैद्यकीय क्षेत्राने दिलेले योगदान खूप महान आहे.

भिंगार छावणी परिषदेच्या हॉस्पिटलने कमी काळात व कमी मनुष्य बळात खूप मोठे सेवा कार्य केल्याने भिंगारची करोना मुक्ती कडे होणारी वाटचाल कौतुकास्पद आहे. याठिकाणी अद्यावत ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी मदत करणार आहे. भविष्यात मी वैय्यक्तिक लक्ष घालून माझ्या सर्व संकल्पना राबवण्याचे अशावासन देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भिंगार भाजपच्या उपक्रमचे मी कौतुक करतो, असे डाॅ. विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com